5G शाप की वरदान (5G Harmful or Not)

5g harmful effect on human body

5G हे वायरलेस तंत्रज्ञानाचे नवीनतम नेटवर्क आहे. याचा वापर मोबाइल फोन आणि ब्लूटूथ डिव्हाइससह जिथे जलद इंटरनेटची गरज आहे अश्या अनेक ठिकाणी केला जातो. (5G effect on human being)

हे वायरलेस तंत्रज्ञान इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन नावाच्या ऊर्जा निर्मिती द्वारे कार्य करते. हे आधीच्या वायरलेस नेटवर्क पेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी (frequencies) वापरते ज्यामुळे ते अधिक जलद आणि कार्यक्षम म्हणून ओळखले जाते.

5G हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्रिक्वेन्सीचा वापर करतात व त्यामुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड (EMF) नावाचे क्षेत्र तयार होते. EMF चा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो असे काही लोकांचे मत आहे.

परिणामी, 5G आरोग्यावर कसा परिणाम करते याबद्दल चिंता हि आहेच. परंतु सध्या 5G मुळे आपल्या आरोग्यावर कोणकोणते घातक परिणाम होतात किंवा नाही होत, यासर्व गोष्टींवर आज आपण चर्चा करू.

5G आणि आतापर्यंतचे झालेले संशोधन काय आहे याबद्दल जाणून घेण्यासाठी हा लेख जरूर वाचा.

5G म्हणजे काय?(What is 5G and how does it work?)

वायरलेस तंत्रज्ञान सतत विकसित होत आहे. अंदाजे दर 10 वर्षानंतर, मोबाइल कंपन्या वायरलेस सिस्टमची नवीन पिढी घेऊन येते. प्रत्येक पिढी हि आधीच्या पिढीपेक्षा अधिक सुधारित आणि प्रगत आवृत्ती (advanced version) आहे.

2019 मध्ये 5G नेटवर्क प्रसिद्ध झाले. “5G” म्हणजे वायरलेस नेटवर्क ची “पाचवी पिढी” (Fifth generation) आहे.

या तंत्रज्ञानामुळे सेल्फ-ड्रायव्हिंग कार्स, व्हर्च्युअल रियलिटी उपकरणे, टेलिमेडिसिन, Remote surveillance, Telesurgery यांसारखे इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि सेवांच्या वाढत्या संख्येस अधिक चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. 5G वेगवान मोबाइल कम्युनिकेशन्स प्रदान करते.

जर आपणाला 5G बाबत अधिक जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही आमचा जगातील सगळ्यात फास्ट इंटरनेट सेवा 5G म्हणजे काय? हा लेख पाहू शकता.

5G तंत्रज्ञानाचा आरोग्यावर काही परिणाम होतो का (What is the side effect of the 5G in marathi?)

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या मते, 

5G मध्ये वापरल्या जाणार्‍या फ्रिक्वेन्सीवर मर्यादित संशोधन आहे, स्पेक्ट्रम मधील इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डचे आरोग्यावर जे दुष्परिणाम होतात त्यावर अधिक संशोधन केले गेले आहे. तथापि, परिणाम अजूनही सुसंगत नाहीत.

आजपर्यंतच्या अभ्यासावरून, EMF चे मानवी शरीरावर काय परिणाम होतो हे आपण पाहू:

Tissue Heating

2017 च्या एका लहान अभ्यासामध्ये असे दिसून आले आहे की मोबाइल फोन 1.8 ते 2.2 GHz च्या वारंवारतेचा (frequencies) वापर करतात. WHO च्या म्हणण्यानुसार या फ्रिक्वेन्सी मुळे टिश्यू हीटिंग होते.

जेव्हा आपली त्वचा विद्युत चुंबकीय ऊर्जा (Electromagnetic Energy) शोषते तेव्हा टिश्यू हीटिंग उद्भवते आणि यामुळे आपल्या मेंदूत आणि शरीरातील तापमानात किंचित वाढ होते.

2021 च्या अभ्यासामध्ये असे आढळले आहे कि, जसे माणसाचे वय  वाढत जाते तसे  EMF संबंधित टिश्यू हीटिंग चा धोका ही वाढत जातो. 

तसेच, वयस्क व्यक्तींमध्ये EMF जितके जास्त तितके ते अधिक टिश्यू शोषून घेतात कारण त्यांच्या त्वचेची जाडी आणि रक्त प्रवाह कमी असतो.

तथापि, टिशू हीटिंग हे अल्पकालीन आणि कमीतकमी मानले जाते. फेडरल कम्युनिकेशन्स आयोग (FCC) असे सांगतात कि EMFs अत्यंत कमी फ्रिक्वेन्सी Expose करतात ज्याची पातळी टिशू हीटिंग करण्यासाठी खूपच कमी आहे.

5G विशेषत: मानवी टिशूवर कसा परिणाम (5G effect) करते हे निर्धारित करण्यासाठी अधिक संशोधनाची आवश्यक आहे.

संज्ञानात्मक कार्य (Cognitive function)

5G च्या एक्सपोजरचा  Cognitive Function वर काय परिणाम होतो याचा अद्याप अभ्यास केला गेला नाही.

2017 च्या एका छोट्या अभ्यासात मोबाइल फोनचा उपयोग संज्ञानात्मक कार्यावर (Cognitive Function) कसा होतो यावर संशोधकांनी परीक्षण केले. 

दिवसातून किमान 90 मिनिटे मोबाइल फोन वापरणे हे लक्ष देण्याच्या अडचणींशी (attention difficulties) संबंधित असल्याचे संशोधकांना आढळले.

2018 च्या झालेल्या संशोधना मध्ये परस्पर विरोधी पुरावे सापडले आहेत. संशोधकांनी EMF आणि संज्ञानात्मक कार्याबद्दल 43 अभ्यासांची तपासणी केली. त्यांनी असा निष्कर्ष काढला की EMF आणि संज्ञानात्मक चिंतां मध्ये कोणताही संबंध नाही.

कर्करोग (Does 5G cause Cancer?)

2011 मध्ये, आंतरराष्ट्रीय एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (IARC) ने म्हटले आहे की EMF मानवांसाठी शक्यतो “Carcinogenic” आहे. हे वर्गीकरण 14 देशांतील 30 शास्त्रज्ञांनी निश्चित केले होते.

आजपर्यंत, बहुतेक अभ्यासकांनी EMF आणि मेंदूच्या कर्करोगामधील संभावंतांची पाहणी केली परंतु निकाल हे विसंगतच राहिले आहेत.

उदाहरणार्थ, 2017 च्या एक संशोधन अभ्यासात असे आढळले आहे की मोबाइल फोनमधून होणारे EMF radiation हे  ग्लिओमाशी (Glioma) संबंधित आहे, जो मेंदूच्या कर्करोगाचा एक प्रकार आहे. 

दुसरीकडे 2018 च्या अभ्यासानुसार उच्च फ्रिक्वेन्सी EMFs आणि मेंदू चा ट्यूमर होतो याचे  स्पष्ट पुरावे सापडले नाहीत.

पुन्हा, 5G फ्रिक्वेन्सी मुळे कर्करोग होतो हे निर्धारित करण्यासाठी अधिक अभ्यास आवश्यक आहे.

5G फ्रिक्वेन्सी द्वारे उत्सर्जित होणारे किरण जनावरांना हानिकारक आहेत का? (What is the effect of radiation on birds and animals?)

5G चा प्राण्यांवर विशेषत: कसा परिणाम (effect) होतो यावर सुद्धा मर्यादित संशोधन आहे.

बहुतेक संशोधनात उंदीरचा समावेश आहे. उदाहरणार्थ, 2019 च्या  प्राणी अभ्यासानुसार असे आढळले कि मोबाइल फोनमधून उत्पन्न होणारे EMF हे उंदीरांच्या डीएनएला नुकसान पोहचवतात. 

दुसर्‍या 2016 च्या अभ्यासामध्ये असे आढळले आहे की कोणत्याही फ्रिक्वेन्सीचे EMF हे मज्जासंस्थेस (nervous system) हानी पोहोचवू शकतात.

2020 च्या संशोधनामध्ये EMFs चा गोगलगाई आणि बेडकावर कसा परिणाम होतो याची तपासणी केली गेली. EMF चा प्राण्यांवर नकारात्मक प्रभाव पडतो का हे अजूनही स्पष्टच  झालेले नाही असे संशोधकांनी सांगितले.

5G प्राण्यांवर काय परिणाम करते हे निश्चित करण्यासाठी अधिक संशोधन करण्याची आवश्यक आहे.

आरोग्यावरील जोखमींबद्दल खोटे दावे (Is 5G Harmful to People? True or False?)

5G रिलीझ झाल्यापासून, त्याच्यामुळे होणारे बरेचसे आरोग्याबद्दलचे खालील काही खोटे दावे सोशल मीडियावर दिसू लागले आहेत.

  • कोविड -19 लसमध्ये 5G मायक्रोचिप्स असतात. 
  • 5G चा उपयोग COVID-19 साथीच्या आजारपणासाठी केला आहे. 
  • 5G हे डोकेदुखी, मायग्रेन आणि चक्कर येण्यासाठी कारणीभूत आहे

परंतु या दाव्यां मागे कोणताही पुरावा नाही.

5G आणि नवीन कोरोनाव्हायरस (5G and Coronavirus relation?)

अशी एक मान्यता आहे की नवीन coronavirus SARS-CoV-2 हे 5G मोबाइल नेटवर्कशी संबंधित आहे, ज्या मुळे कोविड -19 ही स्थिती उद्भवते. परंतु हे खोटे आहे.

अफवां नुसार, 5G थेट विषाणूचा प्रसार करते असे सांगितले जाते. परंतु विषाणूचा प्रसार हा श्वसनाच्या थेंबातुन होतो. वायरलेस नेटवर्क मधून नाही.

काही अफवा असा दावा करतात की 5G आपली रोगप्रतिकार शक्ती कमी करते, ज्यामुळे SARS-CoV-2 चा धोका वाढतो, व कोविड -19 होतो, पण हे देखील खोटे आहे. 

EMF किंवा 5G आपल्या व्हायरल इन्फेक्शनच्या जोखमीवर परिणाम करतात याचा कोणताही पुरावा नाही.

5G वर बंदी घालणार आहेत का?(Will 5G be banned?

कोणत्याही नवीन येणाऱ्या तंत्रज्ञानाचे जेवढे फायदे असतात आणि तसेच काही प्रमाणात तोटे देखील असू शकतात. त्यामुळे बऱ्याच वेळा नवीन आलेले तंत्रज्ञान मोडून पडते किंवा त्यांचा काही संस्थानंकडून विरोध केला जातो. 

5G चे ही तसेच सुरु आहे. त्यामुळे माणसाच्या शरीरावर वाईट परिणाम (Effect) होतात असे काही पुरावे आहेत त्यामुळे समाजच्या विविध क्षेत्रातून त्यावर बंदी घालावी असे पर्याय समोर येत आहेत.  

5G तंत्रज्ञान शाप कि वरदान?

संपूर्ण जग बदलण्याचा दावा करणारे हे तंत्रज्ञान प्राण्यांसाठी मोठा धोका असल्याचे वर्णन केले जात आहे. 

नेदरलँडमध्ये चाचणी दरम्यान अचानक शेकडो पक्ष्यांनी आपला जीव गमावला तेव्हा 5G effect बद्दल हा महत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

अलीकडेच नेदरलँडच्या हेग शहरात शेकडो पक्ष्यांच्या आकस्मिक मृत्यूची बातमी वेगाने पसरण्यास सुरुवात झाली.

एका वेबसाईट नुसार, हेगमध्ये 5G चाचणी दरम्यान सुमारे 297 पक्ष्यांनी आपला जीव गमावला. 

यापैकी, चाचणी सुरू झाल्यानंतर लवकरच 150 पक्ष्यांचा मृत्यू झाला, 5G चाचणीच्या किरणोत्सर्गाचा परिणाम इतका वाईट होता की जवळच्या अनेक तलावांमध्ये बदकांच्या कळपात विचित्र वागणूक दिसून आली. ती वारंवार तिचे डोके पाण्यात बुडवून बाहेर येत होती. 

याआधीही स्वित्झर्लंड मधील एका शहरात 5G चाचणी दरम्यान गायींचा कळप अचानक जमिनीवर पडला. 

बर्‍याच पर्यावरणीय संबंधित डॉक्टरांनी असा इशारा दिला आहे की जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन 5G तंत्रज्ञानामध्ये वापरला जातो तो प्राण्यांच्या त्वचेद्वारे फार जलद शोषला जातो, यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. 

पण याची दुसरी एक अशी बाजू समजावून सांगतांना 5G चे बरेच प्रवर्तक असा दावा करतात की हे तंत्रज्ञान डेटा ट्रान्सफर बरेच वेगवान करेल आणि ऊर्जा आणि आर्थिक खर्च देखील कमी करेल, पण यासाठी सर्वाधिक रेडिओ फ्रिक्वेन्सी बँड वापरावे लागतील.

एकीकडे, रिमोट सेन्सिंग सारख्या तंत्रज्ञानास वेगवान चालना मिळणार आहे, तर 5G नेटवर्क अनेक क्षेत्रात खूपच मदत करेल. 

अशा परिस्थितीत मोठ्या देशांमध्ये बसलेले सायबर तज्ञ छोट्या देशांच्या अर्थ व्यवस्थेत सहज डोकावू शकतात. 

त्यामुळे बाकीच्या देशांची सुरक्षा आणि दहशतवादी कारवायांचा धोका वाढू शकतो. 

हेच कारण आहे की, चीन, अमेरिका, उत्तर कोरिया आणि जपानसह अनेक देश 5G नेटवर्कबद्दल खूप काळजी घेत आहेत जेणेकरून येणाऱ्या काळात त्याचे मोठे नुकसान होणार नाही.

5G नेटवर्क हे नवे तंत्रज्ञान आहे. त्याचे अजून परीक्षण चालू आहे. कोणत्याही देशात पूर्णपणे हे तंत्रज्ञान वापरले गेलेले नाही. 

5जी नेटवर्क मानवी जीवनावर तसेच प्राणीमात्रावर होणार परिणाम याचा सर्वसमावेशक अभ्यास अजून झालेला नाही आणि जोपर्यंत पूर्ण क्षमतेने याचा वापर होत नाही तो पर्यंत याचे मानवी जीवनावर तसेच प्राणीमात्रावर होणारे तोटे कळणार नाहीत. 

5G चे बरेच प्रवर्तक असा दावा करतात की हे तंत्रज्ञान डेटा ट्रान्सफर बरेच वेगवान करेल आणि त्याचा मानवी जीवनावर खूपच मोठ्या प्रमाणावर परिणाम होईल. 

या तंत्रज्ञानामुळे आरोग्य, ऑटोमोबाईल, आणि सर्वप्रकारच्या उद्योग क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणावर सुधारणा होईल आणि मानवी जीवन सुकर होईल. 

मानवी जीवनावर वा प्राणीमात्रावर रेडिएशन चा परिणाम कमीत कमी कसा होईल आणि जग प्रगती पथावर कसे धावेल याचा नक्कीच विचार होत राहील. 

त्यामुळे आम्हाला असे वाटते कि  5G नेटवर्क वर कोणताही देश सरसकट बंदी घालणार नाही. 

निष्कर्ष

5G हे नवीनतम वायरलेस नेटवर्क आहे. हे उच्च इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्रिक्वेंसी तयार करून जलद मोबाइल संप्रेषण (mobile communication) प्रदान करते.

सध्या 5G हे मनुष्यामध्ये किंवा प्राण्यांच्या आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पाडण्याचे कोणतेही ठोस पुरावे नाहीत. बहुतेक संशोधकांनी सर्वसाधारणपणे EMF चा अभ्यास केला आहे आणि त्याचे मिश्रित परिणाम आढळले आहेत.

5G समजण्यासाठी अधिक अभ्यासाची आवश्यकता आहे, ते SARS-CoV-2 व्हायरसशी संबंधित नाही, ज्यामुळे COVID-19 होतो. 

5G तंत्रज्ञान नवीन कोरोना व्हायरस पसरवत नाही किंवा विषाणूचा संसर्ग करत नाहीत.

आपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,

हे हि वाचा –

  1. शाकाहारी दूध म्हणजे काय? ते कसे बनते?
  2. क्रिप्टोकरन्सी इतकी ऊर्जा का वापरतात? 
  3. देशात कोरोना काळात रुग्णालये SOS संदेश का पाठवत आहेत?
  4. नियमित व्यायामामुळे गंभीर कोविड आजारा पासून बचाव होण्यास मदत होते का?

आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.

आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही  नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.

आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.

वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद !

Leave a Comment