अटल टनेल Atal tunnel

modi on atal

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात मोठा बोगदा “Atal tunnel” चे शनिवारी २ ऑक्टोबर रोजी  हिमाचल प्रदेशातील रोहटांग  येथे उद्घाटन केले.

या बोगद्यामुळे हिमाचल प्रदेशातील  जनतेला मोठा फायदा होईलच, परंतु भारतीय लष्कराला रसद पुरवणे हे काम देखील सोपे होणार आहे.

तसेच चीन कडील सीमेवर कोणत्याही ऋतुमध्ये पोहोचणे देखील आता सोपे होणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

लेह-लडाखमधील शेतकरी, मजूर आणि युवकांना आता राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे.

या टनेलमुळे आता मनाली आणि केलांगमधील अंतर ३ ते ४ तासांनी कमी होणार आहे.

आपण खाली दिलेल्या नकाश्यामध्ये पाहू शकता आधीच रस्ता आणि आताचा  atal tunnel. 

अटल टनेल भारताच्या सीमेवरील पायाभूत सुविधांना नवी शक्ती प्रदान करणारा ठरणार आहे.

अटल टनेल हा जागतिक पातळीवरील सीमासंपर्काचे एक जीवंत उदाहरण आहे,

हिमालय क्षेत्र, जम्मू आणि काश्मीर, कारगील, लेह-लडाख, उत्तराखंड, मध्ये अनेक प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहेत. या बरोबरच अनेक प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गाला असल्याचे PM  मोदी म्हणाले. 

हा बोगदा जगातील सर्वात मोठा बोगदा आहे. या बोगद्याची लांबी ९.०२ किमी इतकी आहे.

या बोगद्यामुळे आता मनाली आणि लेहदरम्यानचे अंतर ४६ किलोमीटरने अंतर कमी झाले आहे.

तसेच संपूर्ण प्रवासाचा वेळ चार ते पाच तासांनी कमी होणार आहे. ९.०२ किलोमीटर लांबीचा या बोगद्यामुळे आता वर्षभर लाहोल स्पिती खोऱ्याशी संपर्क सुरू राहणार आहे.

या पूर्वी हिमवर्षावामुळे या खोऱ्याचा संपर्क सहा महिन्यांसाठी तुटलेला असायचा.

Map of atal tunnel

हे असणार या बोगद्याचे फायदे…. 

रोहतांग टनलमुळे किंवा अटल बोगद्यामुळे मनाली आणि किलाँगमधील ४६ किलोमीटरचं अंतर कमी होणार आहे.

ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे लाहौल स्पितीसारखा जो भाग देशापासून सहा महिने संपर्कात नसतो तोच भाग आता बाराही महिने संपर्कात राहणं शक्य होणार आहे.

समुद्रसपाटीपासून जवळपास १२ हजार फुटांच्या उंचीवर साकारण्यात येणारा हा बोगदा जगातील सर्वात मोठा ट्रॅफिक टनल मानला जात आहे. ज्याच्या निर्मिती साठी जवळपास चार हजार कोटी रुपये इतका खर्च आला असल्याचा अंदाज आहे. 

मुख्य म्हणजे सर्वसामान्य नागरिकच नव्हे, तर येत्या काळात हा बोगदा सैन्यदल वाहनांच्या वाहतुकीसाठीसुद्धा फायद्याचा ठरणार आहे.

पीर पंजालचे पर्वत पोखरुन तयार करण्यात येणाऱ्या याच बोगद्याखाली आणखी एका बोगद्याची निर्मिती करण्यात येत आहे. ज्या माध्यमातून अटीतटीच्या प्रसंगी तो फायद्याचा ठरु शकेल. 

बीआरओच्या निरिक्षणाअंतर्गत साकारल्या जाणाऱ्या या बोगद्यासाठी  भारतातीलच एक जाँईंट वेंचर कंपनी एफकॉन यांच्या सोबत करणार आहे. 

Atal Tunnel हा जगातील सर्वात उंच बोगदा आहेच, पण त्याचसोबत आणखी काही असे बोगदे जगाच्या पाठीवर आहेत की त्यांचे बांधकाम बगुन आपल्याला विश्वास बसणार नाही.

चला तर मग बगूया जगातले सर्वात जास्त लांबीचे पाच बोगदे-

१. लॉर्ड्ल Lærdal टनेल 

laeredals tunnel

हा टनेल  जगातला सर्वात जास्त लांबीचा रोड टनेल आहे. त्याची लांबी २४.५१ किमी आहे.

हा टनेल नॉर्वे या देशात आहे. लॉर्ड्सला आणि ऑरलँड या दोन शहरांना जोडणारा आणि युरोपिअन रूट E -16 चा भाग आहे. 

२. यामाते टनेल 

yamate tunnel japan

हा टनेल जपान मध्ये आहे. त्याची लांबी 18.20 किमी आहे.

हा टनेल जपानची राजधानी टोकियो C2 शूतो एक्सप्रेस वे रिंग रोड चा भाग आहे . ताकामातसु आणि ऑरलँड या दोन ठिकाणांना जोडणारा टनेल आहे. 

३. झोंगन्शनशान  टनेल 

zonzhignzon tunnel china

हा टनेल चीन मध्ये आहे. त्याची लांबी 18.04 किमी आहे. हा टनेल झोंगनन माउंटन मधून जातो.

हा टनेल दोन लाइन मध्ये बनविला आहे. हा टनेल जी 65 बाओटो – मॉमिंग एक्सप्रेसवे चा भाग आहे.  

४. गोथर्ड रोड टनेल.

gotharid road tunnel

हा टनेल स्वित्झर्लंड मध्ये आहे. त्याची लांबी 16.918 किमी आहे.

हा टनेल आल्प्स पर्वत रांगे मधील गोथर्ड पासमधून जातो. उरी आणि तिसिनो या दोन ठिकाणांना जोडणारा टनेल आहे.  

५. माउंट ओवीत टनेल

mount ovit tunnel

हा टनेल तुर्कस्तान मध्ये आहे. त्याची लांबी 14.346 किमी आहे.

हा टनेल ओवीत पर्वत रांगे मधून जातो. Ikizdere आणि Ispir  या दोन ठिकाणांना जोडणारा टनेल आहे.  

मला आशा आहे की आपणास हा लेख आवडला असेल.

आपण माझे आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,

  1. स्मार्टफोन म्हणजे काय ?
  2. कृत्रिम बुद्धिमत्ता (artificial-intelligence) म्हणजे काय ?
  3. Android म्हणजे काय?

आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.

आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही  नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.

वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद ! 

Leave a Comment