Best Smartphone of 2020

best smartphone of 2020

2020 मधील सर्वोत्कृष्ट फोन कोणता आहे? असा प्रश्न खूप लोक विचारत असतात. हे वर्ष आपल्यासाठी एक कठीण वर्ष होते परंतु स्मार्टफोन उत्पादकांनी नवीन मोबाईल फोन बाजारात आणायचे काम काही थांबवले नाही.

यावर्षी आम्ही केलेल्या सर्वेक्षणानुसार बहुतेक स्मार्टफोन त्यांची किंमत विचारात न घेता, चांगले आणि कौतुकास्पद आहेत. 

तथापि, जेव्हा सर्वोत्तम फोनच्या यादीमधील फक्त एका सर्वोत्कृष्ट फोनची निवड करण्याची वेळ येते तेव्हा आमचे कार्य अधिक कठीण होते.

2020 मधील सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन तुम्हाला सांगण्यासाठी आम्ही त्यांची वेगवेगळ्या भागांमध्ये विभागणी केली आहे आणि प्रत्येक विभागांमधून एक  निवडला आहे. चला तर मग सुरवात करूया.

2020 चा सर्वोत्कृष्ट Budget स्मार्टफोन

2020मध्ये 15000 किमतीच्या range मधील बरेच चांगले budget स्मार्टफोन उपलब्ध आहेत. जसे कि poco x2, poco x3, redmi note 9 pro किंवा pro max, realme 7 आणि motorola 1 fusion plus.

हे सर्व चांगले budget स्मार्टफोन आहेत. पण 2020 मधील सर्वोत्कृष्ट budget स्मार्टफोन विभागामध्ये Poco x2 हा स्मार्टफोन विजयी होतो.

Poco x2 हा परफेक्ट फोन नाही परंतु या विभागामध्ये हा सर्वोत्कृष्ट फोन आहे. सर्व फोनच्या तुलनेत या फोनचा display आणि कॅमेरा performance अधिक चांगला आहे. 

खरं तर मला असे वाटते की  poco x2 हा फोन नवीन poco x3 पेक्षा अधिक चांगला आहे कारण poco x2 चा कॅमेरा आणि आणि design खूप चांगले आहे.

2020 चा सर्वोत्कृष्ट कॅमेरा Smartphone

या विभागामध्ये Huawei कंपनी बाजारपेठेत अग्रगण्य म्हणून उदयास आली आहे, म्हणूनच Huawei Mate 40 Pro चा विजय होणे काही आश्चर्यकारक नाही. Sony sensors, Leica know-how आणि Huawei engineering एक विजयी combination असल्याचे सिद्ध झाले आहे, पण काही कारणांमुळे हा फोन जास्त लोकप्रिय होऊ शकला नाही.

2020 चा सर्वोत्कृष्ट Mid-Range Budget Smartphone

2020 मध्ये Mid-Range budget स्मार्टफोन  जास्त focus मध्ये आहेत कारण ते परवडणारे आहेत आणि तसेच ते high-end फोन पण आहेत. जसे कि Redmi 7 pro, Galaxy m51, नवीन Moto g 5G, Oneplus note आणि Pixel 4a.   

मला वैयक्तिकरित्या हे सर्व स्मार्टफोन आवडतात आणि मी त्यांचा वापर केला आहे परंतु सर्वोत्कृष्ट मिड-रेंज स्मार्टफोन पुरस्काराचा विजेता Oneplus note  आहे यात काही शंका नाही.  

मी oneplus Nord आणि pixel 4a मध्ये गोंधळात पडलो होतो पण oneplus Nord या अधिक शक्तिशाली फोनमध्ये high refresh rate आहे व तसेच screen ला future-proofing साठी 5g support आहे आणि आता त्याला clean software experience देखील आहे. 

याचा camera सर्वोत्कृष्ट नाही परंतु त्या व्यतिरिक्त इतर सर्व घटक त्याच्या किंमतीनुसार त्याला सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन बनवतात म्हणूनच या विभागामध्ये Oneplus Nord हा विजयी झाला आहे. 

2020 चा सर्वोत्कृष्ट Compact Smartphone

2020 मध्ये बाजारात आणले गेलेले स्मार्टफोन हे मोठे आणि अवजड आहेत  म्हणूनच आम्ही या वर्षी हा आणखी एक विभाग तयार केला आहे. खरं तर जेव्हा आम्ही या पुरस्कारासाठी स्पर्धकांचा विचार करीत होतो तेव्हा आम्हाला खरोखरच कठीण वाटले आणि त्यातून फक्त चार स्मार्टफोनला निवडले.

पहिला फोन स्पष्टच आहे तो म्हणजे iPhone 12 mini, त्यानंतर google pixel 4a आहे. तसेच Galaxy S20 जो थोडा उंच आहे परंतु खूप compact पण आहे, आणि शेवटी iPhone SE. 

हे सर्व चांगले compact फोन आहेत, जसे की आकारमान आणि वजन. यावरुन आपण पाहू शकता सर्वोत्कृष्ट compact स्मार्टफोन पुरस्कार विजेता google pixel 4a ठरेल. 

प्रामाणिकपणे सांगायचे तर, आम्ही iPhone 12 mini, आणि google pixel 4a या दोन्ही अतिशय संक्षिप्त फोन मध्ये गोंधळात पडलो होतो पण दिवसाच्या शेवटी आम्ही google pixel 4a ला निश्चित केले. 

भारतीय स्मार्टफोन बाजाराच्या दृष्टीकोनातून iPhone 12 mini खूप महाग असून त्याची किंमत 70000 आहे. google pixel 4a हा फोन पण एवढा स्वस्त नाही परंतु iPhone 12 mini एवढा महाग पण नाही म्हणून  Google pixel 4a हा पुरस्कार जिंकतो.

Google pixel 4a

2020 चा सर्वोत्कृष्ट Gaming Smartphone

या विभागामध्ये अजिबात स्पर्धा नाही आणि मला असे वाटते की विभागातील सर्वोत्कृष्ट गेमिंग फोनमध्ये एकच स्पष्ट विजेता आहे. 

2020 चा सर्वोत्कृष्ट गेमिंग फोन पुरस्कार स्पष्टपणे Rog Phone 3 ला मिळतो. प्रामाणिकपणे, जरी इतर देशातील गेमिंगचे फोन भारतात लाँच झाले तरीही हा पुरस्कार Rog Phone 3 जिंकू शकेल कारण हा फोन वास्तविक गेमिंग फोनचा सर्वोत्कृष्ट अनुभव देतो. . 

या फोनमध्ये air triggers 3 हे motion sensor आहेत आणि काही Gaming accessories देखील आहेत जे इतर कोणत्याही  फोनमध्ये उपलब्ध नाहीत म्हणूनच या वर्षाचा Rog phone 3 हा सर्वोत्कृष्ट गेमिंग फोन आहे यात काही शंका नाही.

2020 चा सर्वोत्कृष्ट Flagship स्मार्टफोन

यावर्षी बरेच flagship फोन लाँच झाले आहेत. जसे की Oneplus 8T, iPhone 12 series, Samsung note 20 ultra, Oppo find X2 Pro. हे 2020 चे सर्वोत्कृष्ट Flagship स्मार्टफोन आहेत. 

हा पुरस्कार iPhone 12 pro ला नाही किंवा iPhone 12 pro max ला पण नाही. कारण हा पुरस्कार iPhone 12 कडे जात आहे. कारण हा नवीनतम iPhone specs आणि वैशिष्ट्ये देतो, 12 pro आणि 12 pro max तुलनेत याच्याकडे कमी त्रुटी आहेत. 

iPhone 12 कडे नसलेल्या गोष्टी म्हणजे lidar scanner आणि telephoto lens म्हणजे एकूणच iPhone 12 हा 2020 चा सर्वोत्कृष्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे.

2020 चा सर्वोत्कृष्ट Smartphone

या वर्षाचा सर्वोत्कृष्ट फोन होण्यासाठी पात्र असा कोणता फोन आहे? आपल्याला माहित असलेला कोणताही फोन पहा जो स्मार्टफोन उद्योगामध्ये या वर्षाचा सर्वोत्कृष्ट फोन होण्यासाठी पात्र ठरतो. 

तर मग आणखी वेळ वाया न घालवता या वर्षाच्या फोनची घोषणा करूया. म्हणून 2020 सालचा पुरस्कार iPhone 12 mini ला जातो, कारण जगात आकाराने मोठे असलेले खूप फोन आहेत पण iPhone 12 mini हा संपूर्ण compact फ्लॅगशिप फोन आहे. 

जसे की यापूर्वी आपण इतर compact फोनवर चर्चा केली आहे, परंतु  iPhone 12 mini हा असा फोन आहे जो अधिक compact आहे. तर iPhone 12 mini हा आपला या वर्षाचा सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन आहे.

iphone-12-mini

आपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,

1.भारतीय कंपनीनें दिली google ला टक्कर । बनविले स्वदेशी File Storage System।

2. नवीन Smartphone घेताय ? तर ह्या गोष्टी नक्की तपासून पहा..

3. Google चे नवीन कडक नियम ( new policy) !

आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.

आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही  नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.

आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.

वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद ! 

Leave a Comment