Google चे नवीन कडक नियम ( New Policy) !

Google ने Google Photos लाँच झाल्यानंतर पाच वर्षांने त्याची policy बदलण्याचे पाऊल उचलले असून त्यात  Google cloud storage ची वैशिष्ट्ये हि देण्यात आली आहेत

नोव्हेंबर महिन्यात google ने त्याची revised storage policy उघड केली असून ती 1 जून 2021 नंतर लागू होणार आहे. हि नवीन policy, Gmail, google-drive आणि google-photo यासारख्या Google च्या सेवा वापरणार्‍या बर्‍याच लोकांना प्रभावित करेल.

Google Photos लाँच  झाल्यावर पाच वर्षांनंतर या policy मध्ये बदल करण्यात आला आहे. व unique feature देण्यासाठी त्यामध्ये Google cloud storage वापरण्यात आला आहे.

Google च्या users ना माहिती असायला हवेत असे काही महत्त्वाचे मुद्दे:

प्रत्येक Google Account वर free 15GB storage मिळते किंवा जर आपल्याला अजून storage हवे असेल तर  Google One member म्हणून अतिरिक्त storage खरेदी करावे लागते. 15 GB  free किंवा खरेदी केलेला अतिरिक्त डेटा हा google Drive, Gmail आणि फोटो यांमध्ये share केला आहे.

Google च्या नवीन policy नुसार 1 जून 2021 पासून, Google Photos वर अपलोड केलेले कोणतेही नवीन फोटो आणि व्हिडिओ या free किंवा अतिरिक्त खरेदी केलेल्या storage वर मोजले जातील. 

आपण Gmail, Drive किंवा फोटों जर सलग 2 वर्ष (24 महिने) वापरत नसाल म्हणजेच त्या app वर तुम्ही inactive असाल तर Google आपण ज्या app मध्ये inactive आहोत त्या app मधील सर्व डेटा delete करू शकतो.

पण जर तुम्ही Google One member असाल आणि storage limit cross केला नसाल तर या नवीन inactive policy चा तुमच्यावर काहीही परिणाम होणार नाही.

आपण फ्री user असला किंवा Google One member असला तरीही, आपण storage limit 2 वर्षांपेक्षा जास्त वेळ cross केली असल्यास आपल्या जीमेल, ड्राइव्ह आणि फोटोंमधील सर्व डेटा delete होऊ शकतो. 

1 जून 2021 नंतर जर आपण inactive असाल किंवा storage limit cross केला असाल तर तुमचा डेटा delete करायच्या आधी google तुम्हाला email, reminders आणि notifications पाठवेल.

जून 2021 पूर्वी आपण upload केलेले कोणतेही high quality फोटो किंवा व्हिडिओ आपल्या 15GB free storage मध्ये धरले जाणार नाहीत. 1 जून 2021 पूर्वी back up घेतलेले फोटो आणि व्हिडिओंना अद्याप storage limit पासून सूट दिली जाईल.

आपल्याकडे google Pixel 1-5 मोबाईल असल्यास, त्या डिव्हाइसवरून अपलोड केलेल्या फोटोंवर परिणाम होणार नाही. त्या डिव्हाइसमधून उच्च गुणवत्तेत अपलोड केलेले फोटो आणि व्हिडिओला 1 जून 2021 नंतरही या बदलापासून सूट मिळेल. 

फोटो अ‍ॅप मधील सेटिंग्जमध्ये backup आणि sync वर जाऊन कोणत्याही वेळी आपण आपल्या backup quality ची पडताळणी करू शकता.

Google प्लॅटफॉर्ममध्ये असे काही साधने उपलब्ध आहेत, जे users ना असे फोटो/व्हिडिओ निवडण्याची परवानगी देईल जे Delete करणे आवश्यक आहे.

आपण आपला storage किती काळ टिकेल यासाठी तुमचा वयक्तिक अंदाज बांधू शकता. हा अंदाज, आपण किती वेळा आपल्या Google खात्यात फोटो, व्हिडिओ आणि अन्य सामग्रीचा backup घेतो यावरून बांधला जाईल.

1 जून 2021 पासून, फोटो अ‍ॅपमधील नवीन free tool वापरून आपण आपले backup घेतलेले फोटो आणि व्हिडिओ सहजपणे manage करू शकता.

हे tool आपण ठेवू इच्छित असलेल्या Memories बघण्यास मदत करेल. Shots surfacing करताना, आपण गडद किंवा अस्पष्ट फोटो किंवा मोठे व्हिडिओ delete करू शकता.

Google च्या  प्रतिमाह 100GB cloud storage असलेल्या subscription services कमीतकमी ₹130 पर्यंत उपलब्ध आहेत. 

आपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,

  1. Jio देणार 1 Gbps इंटरनेट स्पीड
  2. WhatsApp आणि Instagram बंद ?
  3. जगातील सगळ्यात फास्ट इंटरनेट सेवा 5G म्हणजे काय?

आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.

आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही  नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.

आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.

वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद ! 

Leave a Comment