Happy Republic Day 2021

Happy Republic Day 2021 to all our lovable reader

भारत माता तेरी गाथा,

सबसे ऊँची तेरी शान,

तेरे आगे शीश झुकाये,

दे तुझको हम सब सम्मान ||

भारत माता की जय ।

26 जानेवारी 2021 रोजी भारत 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. याला गणराज्य दिन असेही म्हटले जाते.

भारतीय संविधान समितीने 26 नोव्हेंबर, इ.स. 1949 रोजी भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला आणि 26 जानेवारी, इ.स. 1950 रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आणले गेले त्यानुसार भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनले.  

भारत या दिवशी लोकशाही, सार्वभौम, गणराज्य बनला म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. 

या दिवशी देशभरात भारताच्या तिरंग्याचे आरोहण होऊन प्रजासत्ताकाला वंदना दिली जाते. भारतात प्रजासत्ताक दिनाला दरवर्षी विविध देशाचे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहत असतात.  

2021 मधील प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन उपस्थित राहणार होते पण कोरोना व्हायरसच्या प्रभावामुळे ते उपस्थित राहणार नाहीत. 

प्रजासत्ताक दिनी भारतीय लष्कराची क्षमता, भारताची संस्कृती आणि तंत्रज्ञावर आधारित परेड सादर केली जाते या वर्षी कोविड विरुद्धच्या लढाई तील आत्मा-निर्भर भारत अभियान (स्वावलंबी भारत अभियान) ही या रचणेची थिम आहे.

26 जानेवारीला नवी दिल्लीतील राजपथ येथे प्रजासत्ताक दिनाच्या परेड दरम्यान प्राण घातक कोविड विषाणू विरूद्ध लस तयार केली याचे प्रदर्शन केले जाईल. 

कोवाक्सिन आणि कोविशिल्ड या दोन देशी लस आहेत आणि 16 जानेवारी 2021 पासून मोठ्या प्रमाणात लसीकरण कार्यक्रम सुरू झाला आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत असलेले बायोटेक्नॉलॉजी विभागाने केलेला अभ्यास असा दर्शवतो की कोरोना व्हायरस या साथीच्या आजारा विरुद्धच्या लढाईत भारताने कसा लढा दिला.

धोरणात्मक पद्धतीचा अवलंब करून आणि प्रत्येक पातळीवर आवश्यक असणाऱ्या सामूहिक वर्तनाचा आणि परिवर्तनाचा उपयोग करून कमीत कमी जीवित हानी कशी होईल हे पाहिले गेले आणि कोरोना व्हायरसशी लढताना जगापुढे एक आदर्श ठेवला. 

आज भारताने विकसित केलेल्या कोवाक्सिन आणि कोविशिल्ड या दोन लशींना जगभरातून प्रचंड मागणी आहे.

कोविड-19 च्या प्रभावाखाली असलेल्या जगापुढे सकारात्मक आशा भारताने जागवली आहे त्यामूळे भारताचा हा प्रजासत्ताक दिन भारत एक अनोखा  प्रजासत्ताक दिन असेल. . 

यावर्षी च्या परेड मध्ये नवीन काय असेल?

फ्रान्स मधून खरेदी केलेले आणि गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये भारतीय वायुसेनेत (IAF) सामील झालेल्या Rafale लढाऊ विमान प्रथमच या परेड मध्ये भाग घेतील. 

हवाई दलाने आतापर्यंत फ्रान्स मधून ऑर्डर केलेल्या 36 Rafale  विमानांपैकी 11 विमानांचा समावेश केला आहे.

या परेडमध्ये पहिल्यांदा महिला फाइटर पायलट सहभाग होतील. भारताच्या पहिल्या महिला लढाऊ पायलटांपैकी एक फ्लाइट लेफ्टनंट भावना कांत या परेडचे नेतृत्व करतील.

या परेडमध्ये 122 सैनिकांचा समावेश असलेली बांगलादेशची सशस्त्र दलाची तुकडी भाग घेणार आहे. या पूर्वी  फ्रान्स (2016) आणि युएई (2017) हे आर-डे मोर्चात भाग घेणारे पहिले दोन परदेशी देश होते.

राम मंदिराची प्रतिकृती या परेड मध्ये एक मुख्य आकर्षण असेल. ज्याचे सध्या अयोध्येमध्ये बांधकाम चालू आहे.

यावर्षीच्या परेड मध्ये काय नसेल.?

पाच दशकांहून अधिक काळा नंतर मुख्य पाहुण्याविना ही पहिली आर-डे परेड असेल, यापूर्वी 1952, 1953 आणि 1966 मध्ये भारताच्या परेड साठी प्रमुख पाहुणे उपस्थित नव्हते.

मागील वर्षी परवानगी दिलेल्या 150,000 वरून प्रेक्षकांची संख्या 25,000 पर्यंत कमी केली गेली आहे. Media तील व्यक्तींची संख्याही 300 वरून 200 करण्यात आली आहे.

या वर्षी माजी सैनिकांची आणि महिलांची परेड तसेच केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या (सीएपीएफ) जवानांची मोटारसायकल स्टंट सुद्धा सादर होणार नाही.

15 वर्षा खालील कोणत्याही मुलांना इंडिया गेट लॉन मध्ये परवानगी दिली जाणार नाही. तसेच, यावर्षी शालेय मुलांचे कोणतेही कार्यक्रम होणार नाहीत. 

कोरोना व्हायरसशी लढतांना भारतीय संस्कृतीने दाखवलेली विजीगुष वृत्ती संपूर्ण विश्वासाठी एक आशा असेल.

अनादी कालापासून भारत जगासाठी (विश्वासाठी) एक विश्वगुरू आहे. अश्या या भारताच्या प्रजासत्ताक दिनी आपण भविष्यात हि भारत जगासाठी विश्वगुरू म्हणून राहील याची जबाबदारी आपल्या सर्व भारतीयांवर आहे. 

Happy Republic Day 2021 to all our lovable reader

आपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,

  1. आता एकाच अँप मध्ये वापरा WhatsApp, Signal आणि Instagram कसे ते पहा: Beeper Chat App
  2. Microsoft ने लाँच केला Surface Laptop Go: काय आहेत खास गोष्टी जाणून घ्या
  3. भारतात Sony पुन्हा घेऊन येत आहे आपला Vaio Laptop : जाणून घ्या फीचर्स

आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.

आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही  नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.

आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.

वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद !

Leave a Comment