Mi Notebook 14 (10th Gen Intel Core i3 Processor, Built-in Webcam) लवकरच होणार भारतात दाखल

mi notebook 14 in marathi

Mi Notebook 14 लॅपटॉप लवकरच 10th Gen Intel Core i3 processor सह भारतात दाखल होणार आहे, याची माहिती Xiaomi ग्लोबलचे उपाध्यक्ष मनु कुमार जैन यांनी tweet द्वारे दिली.

प्रत्येकाला ठाऊक आहे की जून महिन्याच्या सुरूवातीस, कंपनीने भारतात Mi Notebook 14 आणि Mi Notebook 14 Horizon Edition बाजारात आणला आहे.

हे लॅपटॉप 10th Gen Intel Core i5 आणि Core i7 processor सह सुसज्ज आहेत.

तथापि, Mi Notebook 14 चे upcoming version हे Intel Core i3 processor variant सह येईल, ज्याची किंमत सध्याच्या दोन मॉडेल्सपेक्षा कमी असू शकते.

Manu Jain यांच्या ट्विटनुसार नवीन Mi Notebook 14 variant हा built-in webcam सह येईल. त्याच वेळी, Mi Notebook 14 हा Core i5 ने सुसज्ज आहे तर Mi Notebook 14 Horizon Edition हा external webcam सह सादर केला गेला आहे.

नवीन मॉडेल 256 GB स्टोरेजसह येईल, जे विद्यमान configurations पैकी एक असेल व लॅपटॉपचे वजन 1.5 किलो असेल.

Tweet मध्ये share केलेल्या चित्राने सूचित केले की नवीन Notebook 14 ची रचना जुन्या Notebook 14 मॉडेलच्या डिझाइनसारखीच असेल, ज्यात एक slim bezel screen आणि sleek body असेल.

नावाप्रमाणेच, notebook चे नवीन मॉडेल 14 इंच display सह येईल.

मात्र, हे कधी सुरू होईल, हे Jain यांच्या ट्विटवरून उघड झाले नाही तरी tweet मध्ये त्यांनी Notebook -14 लवकरच येणार असल्याचा उल्लेख केला आहे.

अशी अपेक्षा आहे की सणासुदीच्या हंगामात upcoming Mi Notebook 14 वर काही सवलतीच्या ऑफर दिल्या जातील.

नवीन Mi Notebook ची किंमत सध्याच्या Core i5 आणि Core i7 मॉडेलपेक्षा कमी असू शकते.

भारतात 10th Gen Intel Core i5 processor सह Mi Notebook 14 च्या  8GB + 256GB मॉडेलची किंमत 41,999 रुपये पासून सुरू होते.

दुसरीकडे, Mi Notebook-14 Horizon Edition च्या Intel Core i5 8GB+512GB मॉडेलची प्रारंभिक किंमत 51,999 रुपये पासून सुरू होते व Notebook Intel core i7 ची किंमत 59,999 रुपये आहे.

जुन्या Mi Notebook -14 प्रमाणेच नवीन variant हा सुद्धा  Nvidia ग्राफिक्स कार्ड पर्यायासह उपलब्ध आहे.

आपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,

  1. इंडियन आर्मीने सुरू केले स्वदेशी मेसेजिंग App एसएआय (SAI)
  2. जगातील सगळ्यात फास्ट इंटरनेट सेवा 5G म्हणजे काय?
  3. हे malware तुमची सगळी माहिती Leak करू शकतात
  4. वाय-फाय (wiFi) म्हणजे काय?

आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.

आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही  नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.

आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.

वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद ! 

Categories Mi

Leave a Comment