काल आकाशात दिसली चंद्राभोवती गोल रिंग ।चंद्राभोवती प्रभामंडळ का बनते ? Ring Around moon।

ring around the moon

काल (मंगळवारी) जर आपण रात्री आकाशाकडे पाहिले असेल तर आपल्याला चंद्राभोवती एक संपूर्ण रिंग असल्याचे दिसलं असेल. तर हे Moon ring कश्यामुळे होते ? 

असा प्रश्न जर आपल्या मनात आला असेल तर स्वाभाविक आहे, तर आज आपण ते का होते त्यामागे शास्त्रीय कारण काय असते ते आज आपण पाहणार आहोत. 

 खरं तर, आपण बारकाईने पाहिले तर गोल इंद्रधनुष्य सारखे चंद्राच्या भोवती एक उजळ स्पॉट्स मध्ये  एक Moon Ring (प्रभामंडळ) दिसते, त्यांचे मुख्य कारण वातावरणातील बदल आहे का  ?

चंद्राभोवतीची ही अंगठी चंद्र-प्रकाशा  (जे खरोखरच सूर्यप्रकाशाने प्रतिबिंबित होते) च्या अपवर्तना (Refraction ) मुळे होते. हे अपवर्तन 5-10 किमी उंचीच्या वरच्या वातावरणात असलेल्या सिरस ढगतील (पांढरे बुरशी सारखे ढग) Suspended स्फटिक बर्फा द्वारे होते. 

इतक्या उंच ठिकाणी सामान्यत: वातावरण कायम अतिशय थंड असते जिथे ढगांमध्ये पाण्याचे रूपांतर स्फटिक बर्फा मध्ये झालेले असते.

बर्फाच्या स्फटिकांचा आकार सुसंगत षटकोनी असतो, त्यामळे त्यामधून जाणारा प्रकाश अपवर्तित होतो. 

चंद्रप्रकाश स्फटिक बर्फा च्या एका बाजूने  जातो आणि नंतर 22-अंशाच्या कोनातून वळतो.

हे वातावरण  प्रचंड अश्या  क्रिस्टल्सने भरलेले असते, सर्व दिशांनी प्रकाश Refraction आणि Relection होत असतो

आणि आपल्या डोळ्यांना प्रकाश अपवर्तनाचा अप्रतिम सोहळा दिसतो. रिंगचा (Moon Halo ring) आकार सामान्यत: 22-अंश असतो

Halo हॅलो 

हॅलो हे वातावरणामध्ये Suspended बर्फाच्या स्फटिकां (क्रिस्टल) अपवर्तित प्रकाशा पासून  (सामान्यत: सूर्य किंवा चंद्रापासून) होणाऱ्या ऑप्टिकल घटनेच्या नाव आहे. 

हॅलो मध्ये आकाशात रंगीत किंवा पांढर्‍या रिंग पासून Arcs आणि Spots पर्यंतचे बरेच प्रकार असतात.

यापैकी बरेच प्रकार  सूर्य किंवा चंद्राजवळ दिसतात परंतु अगदी आकाशाच्या उलट भागात सुद्धा दिसतात. 

प्रख्यात हॅलो प्रकारांपैकी गोलाकार रिंग ( प्रभामंडळ), Pillers, Moon Mocs आणि Sun  ogs आहेत, परंतु बरेच इतरत्र आढळतात, काही बर्‍यापैकी सामान्य असतात तर काही (अत्यंत) दुर्मिळ असतात.

अनुक्रमणिका

Sun Halo  

हे सूर्याच्या प्रकाश मुळे तयार होणारे प्रभामंडळ आहे, मुख्यता दिवसा हे प्रभामंडळ दिसते. 

Mock Moon Ring 

चंद्रा क्षितिजाच्या अगदी जवळ असताना त्या वेळी चंद्राच्या दोन्ही बाजूंनी दिसू शकतील असे तेजस्वी स्पॉट्स  दिसतात.

ही रिंग क्षितिजाच्या समांतर चंद्राच्या अंगठीच्या दोन्ही बाजूला असते. 

हे हेक्सागोनल-प्लेट-आकाराच्या बर्फाच्या स्फटिकांद्वारे चंद्रप्रकाशाच्या अपवर्तनामुळे उद्भवलेल्या चंद्राच्या प्रभागातील तुलनेने दुर्मिळ चमकदार गोल दिसतात.

हे सिरस किंवा सिरोसस्ट्रॅटस ढगांमुळे तयार होतात.

Moon Piller 

विशिष्ट परिस्थितीत, विशेषत: आर्कटिकमध्ये, जेथे बर्फाचे स्फटिक पृष्ठभागाच्या अगदी जवळ असतात,

त्यावेळी चंद्रावरील प्रकाश पृष्ठभागाजवळील बर्फाचे स्फटिक प्रतिबिंबित करतो आणि क्षितिजा जवळ एक चमकता प्रकाश निर्माण होतो त्याला Moon Piller (चंद्र स्तंभ) म्हणतात. 

मला आशा आहे की आपणास हा लेख आवडला असेल.

आपण माझे आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,

  1. स्मार्टफोन म्हणजे काय ?
  2. कृत्रिम बुद्धिमत्ता (artificial-intelligence) म्हणजे काय ?
  3. Android म्हणजे काय?

आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.

आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही  नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.

वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद ! 

Leave a Comment