things to consider when online buying (2021): ऑनलाईन प्रॉडक्ट खरेदी करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी आपण विचारात घ्याव्यात?

things to consider when online buying (2021)

आपण देखील online buying करता का? आपली कधी फसवणूक झाली आहे का? जर नसेल तर ती चांगली गोष्ट आहे. परंतु आता या 2021 वर्षात सावध रहा, म्हणून खालील माहिती वाचा.

घोटाळे आणि फसवणूक पासून सावध रहा (Scams and Fraud) 

ऑनलाइन शॉपिंग साइटची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 

काही साइट कायदेशीर व्यवसाय करीत आहेत आणि काही इतर साईट्स ज्यावर नमूद केलेली उत्पादने अस्तित्वातही नसतात पण तरीसुद्धा व्यवसाय करीत असतात. 

अश्या काही फिशिंग साईट्स वरून ऑनलाइन शॉपिंग करताना क्रेडिट कार्ड / डेबिट कार्ड चे तपशिल, Password, आपली वैयक्तिक माहिती चोरू होऊ शकते. त्यामुळे कोणत्याही साइट वरून प्रॉडक्ट खरेदी करण्यापूर्वी दोनदा विचार करा. 

साइट सुरक्षित आहे की नाही ते तपासा

सुरक्षित साइट पत्ता “HTTPS://’ ने प्रारंभ होतो तर सुरक्षित नसलेला साइट पत्ता “HTTP://’ ने प्रारंभ होतो. 

म्हणून साईट निवडताना आपल्याला खूप काळजी घ्यावी लागेल.   

परतावा आणि रद्द यांचे धोरण काय आहे? (Return, Refund & Cancellation) 

Online Buying करताना प्रॉडक्टची गुणवत्ता प्रत्यक्ष पणे आपण तपासू शकत नाही, 

पण प्रॉडक्ट परत (Return) घेणे, उत्पादनाचा परतावा (Refund) मिळणे आणि ऑर्डर रद्द करण्याचे धोरण तपासणे महत्वाचे आहे.

आपण अश्या अनेक घटना ऐकल्या असतील कि,

उदा.महागडी साडी विकत घेतली परंतु ती खराब असल्याचे आढळले आणि जेव्हा ऑनलाइन वेबसाईटशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी सांगितले की कंपनीच्या रिटर्न पॉलिसी नुसार “आम्ही हे उत्पादन परत घेऊ शकत नाही”.

असेही होऊ शकते की आपण एखाद्या अज्ञात वेबसाइट वरून एखादे प्रॉडक्ट खरेदी केले आणि नंतर आपण ते रद्द केल्यास आपल्याला त्याचा परतावा (Refund) मिळू शकत नाही.

आपल्याला अश्या घटना टाळायच्या असल्यास, तर आपले अमूल्य 10 ते 15 मिनिटे वेळ घालवा आणि त्या ऑनलाईन साईटचे खरेदी धोरण काय आहे? 

आणि ते आपल्यासाठी योग्य का? आणि असे असेल तरच पुढे जा. 

हा छोटासा प्रयत्न तुम्हाला ऑनलाईन खरेदी करताना वेळेची तसेच पैशाची बचत करण्यास मदत करेल. 

वितरण वेळ आणि शिपिंग खर्च (Delivery Time and Shipping Costs )  

प्रॉडक्ट आपल्या ठिकाणी पोहचायला किती दिवस लागतील त्या नुसार शिपिंग कॉस्ट (Shipping Cost) ठरलेली असते. तुम्हाला कमी दिवसात प्रॉडक्ट हवे तर तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागतील. 

कोणतेही प्रॉडक्ट ऑनलाइन खरेदी करण्या पूर्वी वेगवेगळ्या वेबसाइट्सवर जा आणि त्या उत्पादनाची शिपिंग कॉस्ट व वितरण वेळ (Delivery Time) तपासून घ्या.

बर्‍याच कंपन्या शिपिंग सवलत (Shipping Discounts) किंवा विनामूल्य शिपिंग (Free Shipping) देतात. अशा ऑफरचा फायदा घेण्यास विसरू नका. 

ग्राहक पुनरावलोकन (Customer Reviews म्हणजे काय?)

ऑनलाइन प्रॉडक्ट (Product) खरेदी करताना त्या प्रॉडक्टचे फीडबॅक म्हणजेच पूर्वी खरेदी केलेल्या ग्राहकांची मते (Reviews) जाणून घेते गरजेचे असते. ती त्या प्रॉडक्टच्या खालील बाजूस वेबसाईटवर उपलब्ध असतात.

ज्या ग्राहकांनी ते उत्पादन आधीपासून वापरलेले आहे त्यांच्याकडून आपल्याला उत्पादनातील खराब समस्या, तुटणे फुटणे आणि रंग जाणे या सारख्या उत्पादनातील विविध समस्या विषयी माहिती मिळते. 

ग्राहकांच्या पुनरावलोकांची (Reviews) तपासणी करून आपण प्रॉडक्ट खरेदी करण्यापूर्वी त्याची गुणवत्ता जाणून घेऊ शकता.

प्रॉडक्ट ची गुणवत्ता कशी तपासावी? (How to check the quality of the product?) 

जेव्हा आपण कोणतेही प्रॉडक्ट ऑनलाइन खरेदी करता तेव्हा आपल्याला असे दिसून येईल की अनेक कंपन्या आपल्या प्रॉडक्टची गुणवत्ता दर्शविण्यासाठी ‘गुणवत्ता रेटिंग’ (Quality Rating) हा शब्द वापरतात.

ते या प्रॉडक्ट ना, फेअर (Fair), नवीन (New) आणि नूतनीकरण (Refurbished).  या वरून रेटिंग देतात, प्रॉडक्टची स्थिती समजण्यासाठी आपल्याला याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.

विशेष ऑफर (Special offers) कधी असतात?

दिवाळी, दसरा, नाताळ, ईद, व्हॅलेंटाइन डे, ब्लॅक फ्रायडे, (Thanksgiving Day) अशा सणांना वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या ऑफर देतात. 

अशा ऑफरचा फायदा घेण्याचा जरूर प्रयत्न करा, यामुळे आपल्या पैशांची बचत होईल.

जास्त सवलतीसाठी कूपन पद्धत उपलब्ध असते, आपण एखादे उत्पादन खरेदी करण्यापूर्वी, सवलतीचे कूपन कोणकोणते आहेत हे निश्चित करा त्यामुळे  खरेदी करताना आपण रक्कम वाचवू शकाल.

पेमेंट द्यायच्या पद्धतीची सुरक्षितता काय असते? (Safety payment method) 

जेव्हा आपण ऑनलाइन पेमेंट पर्याय निवडता तेव्हा ऑनलाइन खरेदी दरम्यान, डेबिट आणि क्रेडिट कार्डची आणि आपली वैयक्तिक माहिती save करण्याचा प्रयत्न करू नका.

काही कंपन्या Password, Messages च्या Permissions यासारख्या अनावश्यक परवानग्या विचारतात आणि त्या त्याचा गैरवापर करतात.

म्हणून कोणतीही परवानगी देण्यापूर्वी याची खरोखर आवश्यकता आहे की नाही याचा विचार करा.

ऑनलाईन खरेदी करताना सुरक्षित व्यवहार करा. 

आपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,

  1. पेपाल (PayPal) कंपनी भारतात आपला व्यवसाय का बंद करीत आहे ?
  2. Xiaomi चा नवीन फ्रेमलेस Concept Phone: No Buttons, No Ports
  3. Should I Buy A 5G Phone Now?: 5G फोन खरेदी करण्याची हि योग्य वेळ आहे का ?

आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.

आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही  नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.

आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.

वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद !

Leave a Comment