आपण नविन Laptop विकत घेताय का? तर या १० गोष्टी व्यवस्थित पहा ..

तर हा ब्लॉग जरूर वाचा laptop विकत घेताना कोणती काळजी घ्यावी.

हे पण वाचा- लॅपटॉप म्हणजे नक्की काय?, History of Laptop?, What is the laptop in Marathi? (2021) 

1) लॅपटॉपचा साईझ (What is the best screen size for a laptop?)

12.5  ते 14 इंच स्क्रीन असलेले laptop जे सहजपणे कोठेही वापरु शकतो असे लॅपटॉप खरेदी करणे आपल्यासाठी उपयोगी ठरेल. 

जर आपण जास्त प्रवास करत नसल्यास किंवा ऑफिस आणि घरामध्ये लॅपटॉप वापरणार असाल तर मोठ्या स्क्रीनचे लॅपटॉप आपण घेऊ शकता. 

2) लॅपटॉप बॅटरी (Which type of battery is best for laptop?)

लॅपटॉपची बॅटरी हा एक अत्यंत महत्त्वाचा निकष आहे. 

जर आपण कामानिमित्त वरचेवर बाहेर जात असाल तर जास्त वेळ चालणाऱ्या बॅटरीचा लॅपटॉप पर्याय अधिक उपयुक्त आहे. 

3) ऑपरेटिंग सिस्टीम (Which OS is better for laptop?) 

आपली ऑपरेटिंग सिस्टीम कोणती असावी Windows 10, Mac OS की Chrome OS. याप्रमाणे आपल्या पसंती नुसार आपण ती घेऊ शकता. 

हे सर्व प्लॅटफॉर्म चांगले आहेत, पण  Windows 10 हा सर्वात जास्त वापरला जाणारा ब्रँड आहे आणि तुलना करता किंमत ही कमी आहे आणि हि OS जगात सर्वात जास्त वापरली जाते.

4) कीबोर्ड (Which keyboard is best for laptop?)

लॅपटॉप विकत घेताना किबोर्ड आणि टचपॅड चेक करून घेणे. विशेषतः टचपॅड व्यवस्थित (Precisionly) ऑपरेट होतो कि नाही हे तपासून घेणे. 

5) CPU (Which CPU is best for laptop?)

सगळ्यात महत्वाचे म्हणजे CPU कोणता असावा?

कारण CPU म्हणजे संगणकाचा मेंदू (Brain) असतो. लॅपटॉपचा  परफॉर्मन्स हा प्रोसेसर (Processor) वर अवलंबून असतो.  त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे कोणकोणते प्रोसेसर असतात ते पाहू या. 

A. Intel 11 Generation CPU: 

इंटेलने 11-Generation चा टायगर लेक (Tiger Lake) प्रोसेसर लाँच केला त्यामुळे पुढील पिढीच्या (Next Generation) लॅपटॉपचा परफॉर्मन्स खूपच चांगला होईल. 

टायगर लेक (Tiger Lake)  processor यामध्ये एक 10-नॅनोमीटर (Nanameter) ची चिप, Iris Xe Graphics आणि थंडरबोल्ट 4 (Thunderbolt 4) या सिस्टीममुळे लॅपटॉपचा स्पीड जवळ पास  4.8Ghz पर्यंत जातो.

त्यामळे वर्कस्टेशन्स (Work Station) आणि हाय-एंड गेमिंग (High End Gaming) लॅपटॉप मध्ये हा प्रोसेसर वापरतात. 

तसेच नवीन ईव्हीओ (EVO) ब्रँडची बॅटरी कमीत कमी 9 तासांपर्यंत चालू शकते. 

B. इंटेल कोअर i9 (Intel Core i9): 

हा इंटेल चा टॉप-ऑफ-लाईन सीपीयू (CPU) आहे. हा प्रोसेसर इतर कोणत्याही चिप पेक्षा वेगवान आहे. 

याचा सध्या उपयोग केवळ प्रीमियम लॅपटॉप (Premium Laptop), वर्कस्टेशन्स (Work Station) आणि हाय-एंड गेमिंग (High End Gaming ) मध्ये होतो. 

त्यामुळे Intel Core i9 लॅपटॉपची किंमत सुद्धा जास्त असते.

C. इंटेल कोअर i7 (Intel Core i7): 

हि इंटेल कोअर आय i5 ची सुधारित आवृत्ती आहे. 

यामध्ये फोर कोअर (Four Core) असतात, त्यामुळे याचा स्पीड जास्त असून वेगवान गेमिंग लॅपटॉप साठी वापरतात. 

इंटेलची कोअर i7Y हि सिरीज देखील आहे ज्याचा परफॉर्मन्स थोडासा कमी आहे. मॉडेल नंबर 10 असलेल्या सीपीयू (CPU) वेगवान आहेत. 

कारण ते इंटेलच्या नवीन, 10 व्या आणि 11 व्या कोअर जनरेशनची (Core Generation) सीरिज आहे. 

D. इंटेल कोअर i5: 

आपण किंमत आणि कामगिरी या दोन्हीची सांगड घालून लॅपटॉप शोधत असाल तर इंटेल कोअर  i5 हा आपल्यासाठी सर्वात सुंदर पर्याय आहे. 

इंटेलच्या नवीन 11 व्या जनरेशन टायगर लेक सीपीयू मध्ये चार कोर आणि अनेक features आहेत जसे कि वाय-फाय 6 (WiFi-6), थंडरबोल्ट 4 (Thunderbolt-4) Connection Port  असतात. मुख्यतः विद्यार्थ्यांसाठी हा पर्याय सर्वात योग्य आहे.

E. इंटेल कोर i3: 

ह्याचा परफॉरमन्स कोअर i5 पेक्षा कमी आहे आणि किंमत देखील कमी आहे. पण आम्ही सूचित करतो कि शक्यतो कोर Core i5 घेणे अधिक उपयुक्त ठरेल. 

F. Intel Xeon: 

हा एक अत्यंत शक्तिशाली प्रोसेसर आहे आणि किंमत सुद्धा जास्त आहे. याचा उपयोग सर्व साधारणपणे व्यावसायिक-दर्जाचे अभियांत्रिकी सॉफ्टवेअर्स, 3D मॉडेलिंग किंवा व्हिडिओ एडिटिंग (Editing) सारख्या सॉफ्टवेअर्स मध्ये होतो.  

पण यामुळे बॅटरी लवकर संपते आणि या प्रकारच्या लॅपटॉपचे वजन जास्त असते.

G. इंटेल पेंटियम / सेलेरॉन (Intel Pentium/Celeron) : 

याचा स्पीड सर्वात कमी असतो परंतु वेब सर्फिंग आणि Documentation सारखी मुख्य कामे आपण करू शकतो. 

पण थोडी जास्त किंमत देऊन कोअर i3 किंवा i5 हे पर्याय जास्त चांगले आहेत.  

H. इंटेल कोअर एम:

(Core M) / कोअर i5 / i7 Y सीरीजला कमी-पॉवर (Power) लागते तसेच कमी उष्णता (Heat) तयार होते यामुळे या प्रोसेसरच्या लॅपटॉपना फॅन नसतो. 

सेलेरॉन पेक्षा यांचा परफॉर्मन्स चांगला आहे.

I. एएमडी रायझेन (AMD Ryzen):

एएमडी रायझेन 4000 (AMD Ryzen 4000) आणि रायझन 5000 (Ryzen 5000) व इंटेल कोअर Core i5 आणि Core i7 यांच्या स्पीड सारखा डिझाइन केलेला प्रोसेसर आहे. 

इंटेल कोर प्रोसेसर पेक्षा रायझन 4000 आणि रायझन 5000 प्रोसेसर अधिक सरस आहेत. 

उदाहरणार्थ, रायझन 5 4500U सीपीयू (CPU) चा परफॉर्मन्स इंटेल कोर i7 पेक्षा जास्त आहे. 

रायझन 4000 आणि रायझन 5000 प्रोसेसरने सज्ज असलेले लॅपटॉप त्यांच्या इंटेल प्रोसेसर च्या तुलनेत स्वस्त आहेत.

J. AMD A, FX/E Series: 

एएमडी (AMD) चे प्रोसेसर – कमी किमतीच्या लॅपटॉपला असतात- कंपनी त्यांना CPU  ऐवजी APU म्हणते – वेब सर्फिंग, मूवी पाहणे यासाठी हे प्रोसेसर चांगले आहेत आणि किंमत सुद्धा कमी असते.

K. ऍपल M1:  

Apple चा लॅपटॉप म्हणजे एक भन्नाट अनुभव MacBook Air आणि MacBook Pro चे प्रोसेसर म्हणजे एकदम पॉवर पॅक लॅपटॉप आहेत. 

फक्त प्रॉब्लेम एकच आहे म्हणजे त्याची किंमत, ह्या laptops ची किंमत 80 ते 90 हजारापासून सुरु होते.  

6) रॅम (RAM):

संगणकचा अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे RAM (Random Access Memory) लॅपटॉप 4 जीबी,  8 जीबी, 16 जीबी, 32 जीबी, 64 जीबी अणि त्यापेक्षा अधिक कॅपॅसिटी च्या RAM मध्ये येतात, परंतु आपल्या बजेट नुसार आणि कामाच्या प्रकारा नुसार आपण आपला लॅपटॉप निवडू शकता.

७) स्टोरेज ड्राइव्ह (Storage Drive) (SSD): 

सीपीयू (CPU) च्या स्पीड पेक्षा आणखी एक महत्त्वाचे म्हणजे आपल्या स्टोरेज ड्राइव्हचा  स्पीड.

हार्ड ड्राईव्ह(Hard Drive) ऐवजी जर आपण सॉलिड स्टेट ड्राइव्ह (SSD) असलेला लॅपटॉप असेल तर आपला स्पीड तीन पटीने वाढतो. पण SSD मुळे लॅपटॉपची किंमत थोडी वाढू शकते.  

८) Laptop Display (Should I buy a 14 or 15 inch laptop?): 

जितके जास्त पिक्सेल (Pixel) असतील तितकी Picture ची Quality चांगली.

पण दुर्दैवाने काही बजेट लॅपटॉप मध्ये अद्याप 1366 x 768 डिस्प्ले (Display) आहेत, म्हणून 1920 x 1080 चा display आम्ही तुम्हाला Suggest करू इच्छितो. 

ज्यांना फुल एचडी (Full HD) किंवा 1080P देखील म्हणतात. कांही High End लॅपटॉप मध्ये 2560 x 1600, 3200 x 1800 किंवा अगदी 3840 x 2160 (4K) चे स्क्रीन आहेत. Quality अप्रतिम आहे परंतु अधिक उर्जा वापरतात त्यामुळे बॅटरी कमी चालते आणि त्याची किंमत ही जास्त असते.

९) टच स्क्रीन (Touch Screen) : 

टच स्क्रीन हे एक इनपुट आणि आउटपुट डिव्हाइस आहे डिस्प्ले बहुधा एलसीडी (LCD) किंवा ओएलईडी (OLED) डिस्प्ले असतात. 

लॅपटॉप मध्ये टचस्क्रीन असेल त्याची किंमत वाढते. पण मोबाईल आणि टॅबलेट (Tablet) सारखा Touch Screen वापरू शकत नाही. 

१०) ग्राफिक्स चिप (Graphics Chip):

गेम्सचा वापर नसेल, 3D सॉफ्टवेअर वापरात नसाल किंवा हाय-रेस व्हिडीओ एडिटिंग (Editing) करत नसल्यास, इंटिग्रेटेड (Intigrated) ग्राफिक्स चिप (Graphics chip) (सिस्टम मेमरी शेअर करणारी) चालू  शकते. 

पण जर आपण वरील सर्व उपयोग करणार असाल तर इंटेलची नवीन Iris Xe graphics किंवा Nvidia or AMD Graphics प्रोसेसरची आवश्यकता लॅपटॉप मध्ये आहे.

११) कनेक्टिव्हिटी (Connectivity) :

4G एलटीई (LTE) किंवा 5G  चा लॅपटॉप / नोटबुक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपल्याला डेटा सबस्क्रिप्शन योजनेसाठी पैसे द्यावे लागतील, सर्वोत्कृष्ट कनेक्टिव्हिटी पर्यायांसह लॅपटॉप पाहिजे असल्यास, वाय-फाय 6 (Wi-Fi-6) असलेला लॅपटॉप निवडावा.  

१२) Laptop ब्रँड Value: 

लॅपटॉपचे डिझाइन Design, मूल्य (Value) आणि Review आणि इतर निकषांच्या बाबतीत लिनोवो (Lenovo), ऍपल (Apple), HP, कॉम्पॅक (Compaq), डेल (Dell), Redmi, Acer, Asus आणि तोशिबा (Toshiba) अशा नामांकित कंपन्या लॅपटॉपच्या उत्पादनात अग्रेसर आहेत.

आपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,

  1. things to consider when online buying (2021): ऑनलाईन प्रॉडक्ट खरेदी करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी आपण विचारात घ्याव्यात?
  2. Xiaomi चा नवीन फ्रेमलेस Concept Phone: No Buttons, No Ports
  3. Should I Buy A 5G Phone Now?: 5G फोन खरेदी करण्याची हि योग्य वेळ आहे का ?

आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.

आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही  नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.

आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.

वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद !

Leave a Comment