नवीन Smartphone घेताय ? तर ह्या गोष्टी नक्की तपासून पहा..

smartphone

सध्या बाजारात विविध क़ीमतीचे आणि बरेच वैशिष्ट्ये (Features) असलेले स्मार्टफोन उपलब्ध आहेत आणि या सर्व प्रकारांमधून एक नवीन smartphone खरेदी करणे आपल्यासाठी अवघड बनले आहे.

स्मार्टफोनच्या किंमती अगदी 5000 पासून 500000 पर्यंत आहेत आणि खूप साऱ्या Features सह बनले आहेत.

तर आज आपण नवीन मोबाइल खरेदी करण्यापूर्वी विचारात घ्याव्या अशा काही महत्त्वाच्या पैलूंवर चर्चा करू.

फोन खरेदी करताना सर्वात पहिला आपण त्याची महत्वाची वैशिष्ट्ये काय आहेत आणि आपण त्याचा वापर नेमका कसा असणार आहे? हे पाहिले पाहिजे.

उदाहरणार्थ, जर आपल्याला फोटोग्राफीची आवड असेल तर आपल्याला इतर वैशिष्ट्यांपेक्षा कॅमेराच्या गुणवत्तेवर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. 

आपण फक्त व्हॉट्सअप, फेसबुक आणि इतर सोशल मीडियासाठी फोन विकत घेणार असाल तर त्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही.

जर तुम्हाला भरपूर प्रमाणात माहिती, गाणी, व्हिडिओ, फिल्म स्टोअर करायचे असेल तर जास्त मेमरी असलेला फोन घ्यावा लागेल.

पण जर तुम्ही गेमर (Gamer) असाल आणि तुम्हाला एखादा अस्खलित गेमिंग अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला चांगला  प्रोसेसर आणि बॅटरी असलेला फोन घेणे गरजेचे आहे आणि त्यासोबतच खालील सर्व वैशिष्ट्ये तपासून घ्यावी लागतील. 

बजेट (आपण किती रुपये खर्च करू शकतो)

आपल्या बजेट नुसार विविध वेबसाइटवर Smartphone च्या किंमती आणि वैशिष्ट्ये पाहू शकता.

नंतर आपल्या बजेटनुसार सर्व स्मार्टफोनची वैशिष्ट्ये तपासा आणि आपल्या आवडीनुसार त्यांची क्रमवारी लावा. आणि खालील बाबींच्या आधारे या सर्व स्मार्टफोनची तुलना करा.

प्रोसेसर (Processor) 

Smartphone मधील सर्व घटकांना नियंत्रित करणारा भाग म्हणजे Processor.

प्रोसेसरची गती हि मोबाईलची कार्य करण्याची क्षमता ठरविते. जर एखाद्या फोन मध्ये 30Mp कॅमेरा आणि 8GB रॅम असेल पण प्रोसेसर जर 5 वर्ष जुना असेल तर आपणास चांगल्या मोबाइल ऑपरेशनचा अनुभव मिळणार नाही.

पूर्वी म्हटल्याप्रमाणे जर आपण गेमर असाल किंवा फोटो/व्हिडिओ (Image/Videos) संपादित करण्यासाठी तुम्हाला फोनची आवश्यकता असेल तर आपण उच्च कार्यक्षम प्रोसेसर उपलब्ध असलेला घेणे आवश्यक आहे अन्यथा आपण फक्त सोशल मीडियासाठी फोन वापरत असाल तर आपण कमी प्रोसेसरसह सुद्धा आनंद घेऊ शकता. 

जर आपल्याला प्रोसेसरची तपशीलवार माहिती हवी असल्यास खालील button वर क्लिक करा. 

मेमरी (Memory)

ROM (Read Only Memory) मेमरी (ज्याला अंतर्गत स्टोरेज देखील म्हटले जाते) एक अशी जागा आहे जिथे आपण आपले फोटो, व्हिडिओ, चित्रपट, गाणे आणि बरेच काही जतन (स्टोअर) करू शकता. 

आपण जर गाणी, चित्रपट याचे शौकीन असाल आणि बरीच गाणी, चित्रपट संग्रहित करू इच्छित असाल तर आपल्यासाठी 128GB मेमरी स्टोरेजचे फोन उपलब्ध आहेत.

पण आपण जर जास्त गोष्टी स्टोअर करत नसाल तर आपण 32 किंवा 16GB स्टोरेज असलेला फोन घेऊ शकता. 

RAM (Random Access Memory) रॅममुळे सुद्धा आपल्या फोनच्या स्पीडमध्ये खूप फरक पडतो आजकाल 2GB ते 16GB रॅम असलेले फोन उपलब्ध आहेत. 

जर आपल्याला मेमरीबाबतची तपशीलवार माहिती हवी असल्यास खालील button वर क्लिक करा. 

कॅमेरा (Camera)

आपण फोटोग्राफीचे चाहते असाल तर मग आपण एक उच्च-गुणवत्तेचा कॅमेरा फोन घेऊ शकता परंतु नेहमी लक्षात ठेवा की जास्त मेगापिक्सेल असलेला कॅमेराचा मोबाईल कायम चांगलाच कॅमेरा असतो असे अजिबात नाही. कॅमेरामध्ये camera aperture, ISO levels, pixel size, autofocus आणि यांसारखे बरेच काही वैशिष्ट्ये  असतात आणि तसेच  प्रत्येक फोनचे Image Processing ही तितकेच आवश्यक असते.

अधिक पिक्सेलचा अर्थ image चा आकार अधिक असतो आणि यामुळे image अधिक sharp होते. त्यामुळे असा फोन पसंद करा कि कॅमेरा तुम्हाला आनंद देऊ शकेल. 

जर आपल्याला कॅमेर्‍याची तपशीलवार माहिती हवी असल्यास खालील button वर क्लिक करा. 

बॅटरी (Battery)

आपण Smartphone वर किती वेळ घालवता किंवा तो किती वेळ वापरता या वर बॅटरीची क्षमता अवलंबून असते. 

जर आपण गेम खेळत असाल किंवा ऍप्स वर काम करत असाल किंवा चित्रपट पाहत असाल तर 4000 mAh बॅटरी किंवा त्यापेक्षा अधिकची बॅटरी पसंत करा.आपण आपल्या मोबाइलवर बराच वेळ घालवत नसाल तर आपण कमीतकमी 3000 mAh ची बॅटरी निवडू शकता जी दिवसभर चालण्यासाठी पुरेशी आहे.

जर आपल्याला बॅटरीची तपशीलवार माहिती हवी असल्यास खालील button वर क्लिक करा. 

डिस्प्ले (Display) 

ज्या लोकांना चित्रपट पाहणे किंवा बातम्यां पाहणे किंवा गेम खेळणे आवडते किंवा काही संपादन कार्य (Editing) करायला आवडते त्यांच्यासाठी 5.6 ते 6 इंच  full HD किंवा QHD Display पुरेसा आहे.

6 इंचापेक्षा अधिक असलेला display हा आपल्या फोनला अधिक अवजड बनवतो आणि यामुळे स्मार्टफोन वापरण्यात अडचणी येऊ शकतात.  

आपण फक्त ईमेल किंवा सोशल मीडिया तपासण्यासाठी स्मार्टफोन वापरत असाल तर 5 ते 5.5-इंच HD किंवा full HD डिस्प्ले आपल्यासाठी पुरेसा आहे.

जर आपल्याला डिस्प्लेची तपशीलवार माहिती हवी असल्यास खालील button वर क्लिक करा. 

सुरक्षा (Security) 

आजकाल लोक इतर वैशिष्ट्यांपेक्षा सुरक्षिततेबद्दल अधिक चिंतित आहेत. स्मार्टफोन मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर, फेस लॉक यांसारख्या अतिरिक्त सुरक्षा देखील आहेत. 

हे केवळ फोनच्या लॉक/अनलॉक वैशिष्ट्याबद्दलच नाही तर काही files, documents किंवा अ‍ॅप्समध्ये प्रवेश करण्यासाठी password सुरक्षा देखील देते.

सुरक्षा वैशिष्ट्यासह फोन विकत घेणे चांगले आहे कारण आजकाल आपल्या सर्वांच्या हँडसेटवर वैयक्तिक माहिती असते.

जर आपल्याला सुरक्षेबाबतची तपशीलवार माहिती हवी असल्यास खालील button वर क्लिक करा. 

ऑडिओ (Audio) 

जर आपण व्हिडिओ स्ट्रीमिंग किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सवर काम करत असाल तर आपल्यासाठी Speakers आणि Audio Quality हे महत्त्वाचे पॉईंट आहेत. आणि त्या प्रमाणे Audio Features आपल्या मोबाईल मध्ये असणे आवश्यक आहे. 

आपणास चित्रपट किंवा गाणे पहायला आवडत असल्यास आपण फ्रंट-फेसिंग स्पीकर असलेला फोन खरेदी करू शकता. लँडस्केप मोडमध्ये फोन धरून आपल्याला तो आवाज अगदी स्पष्ट ऐकता येईल. 

जर आवाज आपल्यासाठी खास महत्त्वपूर्ण नसेल तर आपण रेग्युलर स्पीकर्स किंवा बॅक स्पीकर्स असलेला फोन घेऊ शकता. 

जर आपल्याला ऑडिओबाबतची तपशीलवार माहिती हवी असल्यास खालील button वर क्लिक करा. 

कनेक्टिव्हिटी (Connectivity) 

लोक घरापासून किंवा कामापासून दूर असताना मोबाईल फोन नेटवर्क किंवा वाय-फाय पब्लिक हॉटस्पॉट वापरुन इंटरनेटशी कनेक्ट होऊ शकतात.

जे घराबाहेर किंवा ऑफिसच्या बाहेर राहून काम करतात  त्यांना मोबाइल हॉटस्पॉट कनेक्टिव्हिटीची गरज असते, मोबाईल हॉटस्पॉट वरून लॅपटॉप कनेक्ट करून ते आपले काम करू शकतात. 

Bluetooth, Wi-Fi, Mobile Network आणि Infrared हे काही short-range connectivity protocols आहेत.

हे mobile phones, smartphones किंवा tablets सारख्या मोबाइल devices मध्ये wireless communication करतात.

मोबाईल खरेदी करताना वरील सर्व कनेक्टिव्हिटी Features चेक करणे गरजेचे आहे.

जर आपल्याला कनेक्टिविटीबाबत तपशीलवार माहिती हवी असल्यास खालील button वर क्लिक करा. 

आपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,

नेटवर्क कोणते आणि कसे असावे ?

Audio कसा असावा ?

मोबाईल सुरक्षित कसा राहील?

डिस्प्ले मोठा असावा की छोटा ?

बॅटरी किती असावी?

कॅमेरा कसा असावा?

फोनची मेमरी किती असावी?

प्रोसेसर म्हणजे काय?

आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.

आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही  नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.

आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.

वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद ! 

Leave a Comment