तुम्हाला माहिती आहे लॅपटॉप मध्ये कोणते हार्डवेअर असतात?(What hardware does a laptop have?)

laptop hardware

लॅपटॉप हार्डवेअर (Laptop Hardware) म्हणजे काय?

लॅपटॉप मध्ये कोणते हार्डवेअर असतात?(What hardware does a laptop have?)

लॅपटॉप असे एक मशीन आहे ज्यात स्क्रीन, टच पॅड, कीबोर्ड, प्रोसेसर, रॅम, हार्ड डिस्क व इतर हार्डवेअर एकत्र जोडलेले असतात.

आपल्या लॅपटॉपमध्ये खालील प्रकारचे हार्डवेअर आहेत-

1) सीपीयू (CPU)

सेंट्रल प्रोसेसिंग युनिट (CPU), जो आपल्या संगणकाचा मेंदू म्हणून कार्य करणारा एक लहान आणि अत्यंत उच्च दर्जाचा सेमीकंडक्टर चिप आहे.  

2) मॉनिटर (Monitor)

मॉनिटर म्हणजे एलईडी / एलसीडी (LED/LCD) स्क्रीन आहे ज्यामुळे आपल्या टीव्ही स्क्रीन सारख्या प्रतिमा (Images) दिसतात. 

आज काही लॅपटॉप टचस्क्रीन (Touch Screen) मॉनिटर्स सह येतात, ज्यामुळे लॅपटॉपला इनपुट प्रदान करण्यासाठी स्क्रीनला स्पर्श करून लॅपटॉपला इनपुट देऊ शकतात.

3) की-बोर्ड (Keyboard)

लॅपटॉप कीबोर्ड हा संगणकाच्या कीबोर्ड प्रमाणेच आहे. मजकूर आणि संख्या टाइप करण्या व्यतिरिक्त, आपण संगणकला आदेशा (Input) देण्यासाठी कीबोर्ड चा वापरू शकतो.

 4) टचपॅड (Touch Pad) :

लॅपटॉपची खरी मजा अशी आहे कि आपण कीबोर्ड शिवाय लॅपटॉप वापरू शकतो, नेहमीच्या संगणकाला माउसची गरज असते पण लॅपटॉपला मध्ये माउसच्या ऐवजी टच पॅड वापरतात.  

पण आपल्या लॅपटॉपवर वायरलेस माउस कनेक्ट करण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे; आपण आपल्या लॅपटॉप वरील यूएसबी पोर्टचा उपयोग करून प्लग इन माउस सह लॅपटॉप ऑपरेट करू शकता.

5) वेबकॅम आणि स्पिकर्स 

आपल्या लॅपटॉपवर वेबकॅम आणि स्पीकर्स आणि कदाचित मायक्रोफोन Inbuilt असतात. 

ज्याद्वारे आपण व्हिडिओ फोन कॉल आणि इन्स्टंट संदेश देऊ शकता. 

स्पीकर्समुळे आपण संगीताचा आनंद घेऊ शकतो आणि विशेष म्हणजे कोरोना व्हायरस च्या प्रकोपामुळे जे लॉकडाऊन झाले अश्यावेळी सर्वाना वर्क फ्रॉम होम साठी किंवा शालेय क्लाससाठी वेबकॅम आणि स्पिकर्स असलेल्या लॅपटॉपची गरज जाणवायला लागली. 

6) पोर्ट्स (Ports)

प्रिंटर (Printer) किंवा स्कॅनर (Scanner) सारख्या डिव्हिसेसना जोडण्यासाठी लॅपटॉप मध्ये वेगवेगळ्या प्रकारची पोर्ट्स असतात. 

आपल्या लॅपटॉपमध्ये अनेक प्रकारचे स्लॉट दिलेले असतात आणि डिव्हाइस जोडण्यासाठी असलेल्या पोर्टला यूएसबी (USB) पोर्ट असे म्हटले जाते. 

हा एक छोटासा स्लॉट (Slot) आहे ज्याला आपण फ्लॅश ड्राइव्ह किंवा पेन ड्राइव्ह, डिजिटल कॅमेरा आणि स्मार्टफोन सारखे इतर अनेक डिव्हाइस कनेक्ट करू शकता.

लॅपटॉपचे विविध प्रकार काय आहेत?

1) अल्ट्राबुक (Ultrabook):

या लॅपटॉपची जाडी खूप कमी असते आणि वजन केवळ 1.8 किलो पर्यंत असते, त्यांची स्क्रीन सुमारे 14 इंचाची असते. बॅटरी life जास्त असते. 

 2) नेटबुक (NetBook).

हे लॅपटॉप बरेचसे कमी शक्तिशाली प्रोसेसर आणि छोटे कीबोर्ड असलेले छोटे व स्वस्त असतात.  

3) टॅब (Tablets) 

छोटे, कमी जाडीचे आणि कमी साईझचे मल्टीटास्क करणारे हे लॅपटॉप खूप लोकप्रिय झाले होते, परंतु त्यांचे मॉनिटर्स अगदी लहान आकाराचे असतात. 

कीबोर्ड खूपच लहान असल्याने त्यावर व्यावसायिक कामे करताना अडचणींचा सामना करावा लागतो आणि त्यांची किंमत खूप जास्त असते.

 4) डेस्कटॉप लॅपटॉप (Desktop Laptop) :

नावा प्रमाणेच ते डेस्कटॉपला पर्याय म्हणून वापरतात, त्यांचे वजन जवळपास 4kg पर्यंत असते आणि त्याची स्क्रीन ही मोठी असते आणि कीबोर्ड देखील मोठा असतो. 

गेमिंग साठी, डेटा Analysis, इंडस्ट्रियल प्लँनिंगसाठी हे लॅपटॉप वापरले जातात.

आपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,

  1. आपण नविन Laptop विकत घेताय का? तर या १० गोष्टी व्यवस्थित पहा ..
  2. लॅपटॉप म्हणजे नक्की काय?, History of Laptop?, What is the laptop in Marathi? (2021)
  3. तुम्हाला माहिती आहे का तुमच्या लॅपटॉपचे किती तोटे आहेत ते ?

आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.

आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही  नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.

आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.

वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद !

Leave a Comment