नेटवर्क कोणते आणि कसे असावे ?What is mobile network technology?

What is mobile network technology

Bluetooth, Wi-Fi, Mobile Network आणि Infrared हे काही short-range connectivity protocols आहेत. हे mobile phones, smartphones किंवा tablets सारख्या मोबाइल devices मध्ये wireless communication करते.

Bluetooth चा उपयोग laptops, tablets, mobiles यासारख्या Bluetooth compatible devices सह वायरलेसरित्या files, photos, videos इ. share करण्यासाठी केला जातो. 

आपला मोबाइल इंटरनेटशी कनेक्ट करण्यासाठी Wi-Fi चा वापर केला जातो, यामुळेच आपल्याला दुसर्या मोबाइल मधील  इंटरनेट आपल्या मोबाईल मध्ये वापरता येते.  

Mobile network किंवा cellular network हे voice communication (फोन कॉल) साठी आणि इंटरनेट सुविधा साठी वापरले जाते . 

मोबाइल फोनमध्ये Infrared connectivity वापरली जाते ज्यामुळे आपण आपल्या घरामध्ये टीव्हीसारख्या विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर नियंत्रण ठेऊ शकतो किंवा मोबाईलचा वापर हा रिमोट सारखा करू शकतो.

चला तर मग या मुद्द्यांविषयी सविस्तर जाणून घेऊ.

अनुक्रमणिका

Bluetooth

Bluetooth तंत्रज्ञान एक low powered वायरलेस तंत्रज्ञान आहे जे file transmission करताना फोन किंवा इतर portable उपकरणांना जोडण्यासाठी डिझाइन केलेले आहे.

आपण कनेक्ट केलेल्या devices वर डेटा पाठवू किंवा प्राप्त करू शकतो.  हे devices साधारणत: 30 फूट किंवा 10 मीटर पर्यंत विशिष्ट अंतरावर असतात जे versions  वर अवलंबून आहे व ते 2.4 to 2.485 GHz band चा वापर करतात.

हे त्याच्या versions नुसार 1 Mbps किंवा 2 Mbps स्पीडने डेटा ट्रान्सफर करते. Bluetooth version 4.2 आणि 5.0 सर्व नवीनतम स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहे.

Bluetooth version 4.2  ची गती 1 Mbps आहे तर 5.0 version मध्ये 2 Mbps वेग आहे जो जुन्या version पेक्षा दुप्पट आहे. 4.2 च्या तुलनेत आपल्या मोबाइलवर कमी उर्जा वापरण्यासाठी Bluetooth 5.0 डिझाइन केले आहे.

Bluetooth 4.2 ची outdoor range 50 मीटर आहे आणि indoor फक्त 10 मीटर आहे. दुसरीकडे, Bluetooth 5.0, outdoor वातावरणामध्ये 200 मीटर range देतो आणि 40 मीटर indoor range आहे.

WiFi

मोबाइलमध्ये Wi-Fi आहे त्याचा अर्थ असा आहे की आपला मोबाइल कोणत्याही वायरलेस नेटवर्कशी कनेक्ट करू शकतो आणि आपण Email किंवा Multimedia streaming सारख्या कार्यांसाठी डेटा कनेक्शन वापरू शकता.

Wi-Fi वापरुन आपला मोबाइल इंटरनेटशी जोडण्यासाठी hotspot (इंटरनेट ब्रॉडबँड) ची आवश्यकता असते आणि बर्‍याच परिस्थितींमध्ये, त्याचा Speed आपल्या मोबाइल नेटवर्कपेक्षा वेगवेगवान  आहे.

आपण आपल्या मोबाइलला जेव्हा Wi-Fi वापरून इंटरनेटशी कनेक्ट करता तेव्हा मोबाईल नेटवर्कच्या तुलनेत ती कमी बॅटरी वापरते  कारण बर्‍याच घटनांमध्ये cellular coverage मध्ये fluctuation होते व त्यामुळे बॅटरी लवकर उतरते. 

आजकाल, आपण बर्‍याच फोनवर WiFi-5 आणि WiFi-6 versions पाहू शकता. WiFi-6 गर्दीच्या ठिकाणी चांगले काम करते कारण तिचा data rate वेगवान आहे जो WiFi-5 पेक्षा 40% अधिक आहे.

Network

प्रत्येकाला त्यांचा फोन एका high-quality network सोबत कनेक्ट केलेला हवा असतो. बाजारात विविध प्रकारचे 4G आणि 5G मोबाइल फोन उपलब्ध आहेत.  

Theoretically, 4G चा वेग 1 GBPS आहे तर 5G चा वेग 20 GBPS पर्यंत आहे म्हणून आपण असे म्हणू शकतो की 5G चा वेग 4G पेक्षा 20 पटीने जास्त आहे. 

Practically, आता Jio आणि Qualcomm या दोघांनी मिळून पहिल्या चाचणी दरम्यान भारतात 5G चा 1GBPS  वेग मिळविला आहे, तर जागतिक पातळीवर 5G चा वेग 5.7 GBPS पर्यंत आहे.

4G ची real-world download गती 100 MBPS आहे आणि ती 3G पेक्षा 20 पटीने वेगवान आहे.

Infrared

Market मध्ये बहुतेक फोन Infrared connectivity सह आले आहेत. हे एक जुने तंत्रज्ञान आहे जे दोन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस वायरलेसपणे जोडण्यासाठी वापरले जाते. 

Infrared connectivity चा वापर करून, आपण TV, set-top box, media player आणि air conditioners आपल्या मोबाइलद्वारे control करू शकता  परंतु काही मोबाईलमध्ये आपल्याला त्यासाठी external app डाउनलोड करावे लागेल.

आपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,

नवीन Smartphone घेताय ? तर ह्या गोष्टी नक्की तपासून पहा.. 

Audio कसा असावा ?

मोबाईल सुरक्षित कसा राहील?

डिस्प्ले मोठा असावा की छोटा ?

बॅटरी किती असावी?

कॅमेरा कसा असावा?

फोनची मेमरी किती असावी?

प्रोसेसर म्हणजे काय?

आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.

आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही  नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.

आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.

वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद ! 

Leave a Comment