What should audio be like?

What should audio be like?

आज आपण स्मार्टफोनमधील ऑडिओ आणि साऊंड इफेक्ट या विषयी माहिती घेऊ. 

एचडी व्हॉईस आणि व्होएलटीई (HD Voice & VoLTE) म्हणजे काय ?

व्होएलटीई (VoLTE) व्हॉईस ओव्हर एलटीईचा अर्थ आहे की अधिक चांगल्या आवाजात व्हॉईस कॉल आणि त्याच वेळी व्हॉईस आणि डेटा वापरण्याची क्षमता स्मार्टफोन मध्ये  वापरण्यासाठी  परिपूर्ण असते.

व्हीओएलटीई हे व्हॉईस ओव्हर एलटीई तंत्रज्ञान आहे आणि ते एचडी (HD)  व्हॉईस सेवांना support करते.(HD-High Definition)

4G  LTE नेटवर्कवर व्हॉईस कॉल VoLTE सिस्टिम हि चांगल्या प्रकारे काम करते. 

4G LTE नेटवर्कशी कनेक्ट केलेले आणि एचडी व्हॉईस-असलेला स्मार्टफोन वापरत असतील तर त्यांना अधिक नैसर्गिक आणि स्पष्ट ऑडिओ अनुभवता येईल.

एचडी व्हॉईसमुळे एकाचवेळी व्हॉईस कॉन्फरन्स कॉल आणि 4G LTE डेटाचा वापर करणे शक्य आहे.  

VoLTE मुळे आवाजाची स्पष्टता  खूपच सुधारली आहे, VoLTE ची गुणवत्ता (Quality) ३G  पेक्षा ३ पट अधिक आणि 2G पेक्षा ६ पट जास्त आहे, 4G नेटवर्क Solution मूळे  आवाजाची अधिक स्पष्टता आणि अधिक चांगला कॉलिंग अनुभव मिळतो . 

ऑडिओ स्पीकर (Audio Speaker)

ज्या स्मार्टफोनमध्ये डॉल्बी साऊंड सिस्टिम (Dolby Atmos) किंवा स्टीरिओ स्पीकर्स Inbuilt असतील तर संगीत प्रेमीसाठी ते स्मार्टफोन सर्वोत्कृष्ट फोन आहेत. 

स्टिरीओ स्पीकर म्हणजे स्मार्टफोन मध्ये दोन स्पीकर्स असतात आणि ते डिव्हाइसच्या डाव्या आणि उजव्या बाजूस fix केलेले असतात.  त्यामुळे स्पीकर मध्ये स्टीरिओ Effect तयार होतो आणि ऐकणार्यांना एक सुखद संगीताचा अनुभव मिळतो. 

स्टिरीओ Effect ROG Phone 3, One Plus 8 आणि 8 Pro , iPhone (8, XS, 11) Series, Samsung Galaxy Note 20 Ultra आणि S20 Series, (X2 Pro, 7 Pro) या स्मार्टफोनमध्ये  उपलब्ध आहे. 

डॉल्बी अटमॉस (Dolby Atmos) हे एक असे साऊंड सॉफ्टवेअर आहे ज्यामुळे  हेडफोन्स वापरून ऑडिओ चॅनेलचे मिश्रण आणि साऊंड फिल्टरिंग करते, त्यामुळे 3D साऊंड  इफेक्ट तयार होतो. हा एक विलक्षण अनुभव आहे. 

Dolby Atmos विस्मयजनक प्रतिमा, आवाज आणि Powerful वास्तववादी आवाजाची विलक्षण प्रतिभा तयार करतो.  

Dolby  Atmos X आणि Y अक्षांमधीलच नव्हे तर 3D (Z) अंशामध्ये ध्वनीचा इफेक्ट तयार करतो.

Apple iPhone 11, iPhone 11 Pro, iPhone11 Pro Max, OnePlus 7 Pro, OnePlus 7T, Samsung Galaxy Note 10 आणि Note 10 Plus, Oppo Reno (2,2 F, 2z), Oppo Reno स्टँडर्ड एडिशन, Realme X, Samsung Galaxy S10 आणि S10+, Realme X2 आणि Realme X2 Pro, Realme XT या सर्व स्मार्टफोनमध्ये ही  सुविधा उपलब्ध आहे. 

ऑडिओ रेकॉर्डिंग (Audio Recording)

आपण ऑडिओ रेकॉर्डिंग किंवा फोन कॉलसाठी मोबाइलचा जर जास्त वापर करत असल्यास आपल्याला सर्वोत्तम मायक्रोफोन असलेला स्मार्टफोन खरेदी करणे आवश्यक आहे. येथे काही ऑडिओ रेकॉर्डिंग गुणवत्तेसह काही स्मार्टफोन आहेत.

२०२० मध्ये लाँच झालेला LG V50 हा स्मार्टफोन ऑडिओ रेकॉर्डिंगसाठी सर्वोत्कृष्ट मोबाईल आहे कारण त्यात उच्च अँप आउटपुट मोड आणि क्वाड डीएसी आहे जो आपल्याला इतर आवाज-मुक्त ध्वनी रेकॉर्ड करण्यास मदत करतो आणि उत्कृष्ट ऑडिओ गुणवत्ता देतो.

Samsung Galaxy S10+ मध्ये हाय-इम्पेडन्स ऑटो-Adjesting, क्वाड डीएसी (Quad DC) आणि चांगले स्पीकर्स असलेले उत्कृष्ट audio हार्डवेअर आहेत.  

आपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,

नवीन Smartphone घेताय ? तर ह्या गोष्टी नक्की तपासून पहा.. 

नेटवर्क कोणते आणि कसे असावे ?

मोबाईल सुरक्षित कसा राहील?

डिस्प्ले मोठा असावा की छोटा ?

बॅटरी किती असावी?

कॅमेरा कसा असावा?

फोनची मेमरी किती असावी?

प्रोसेसर म्हणजे काय?

आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.

आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही  नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.

आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.

वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद ! 

Leave a Comment