Amazon चे CEO होणार रिटायर: Jeff Bezos कोण आहेत?

जेफ बेझोस (Jeff Bezos) कोण आहेत?

Jeff Bezos एक अमेरिकन इंटरनेट उद्योजक, उद्योगपती, मीडिया प्रोप्रायटर आणि गुंतवणूकदार आहेत. 

Embed from Getty Images

जेफ्री प्रेस्टन बेझोस हे कॉर्पोरेट जगात जेफ बेझोस (Jeff Bezos)  म्हणून लोकप्रिय आहेत. 

अमेझॉन (Amazon) या बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत. 

जेफ बेझोस यांचे शिक्षण काय?

12 जानेवारी, 1964 रोजी अल्बुकर्क येथे जन्म झाला नंतर मियामी आणि ह्यूस्टन येथे त्यांचे सुरवातीचे शिक्षण झाले.

जेफ बेझोस यांनी 1986 मध्ये प्रिन्सटन विद्यापीठातून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी आणि संगणक विज्ञान या विषयामध्ये पदवी प्राप्त केली. 

अमेझॉनची स्थापना कधी झाली?

जेफ बेझोस (Jeff Bezos) यांनी 5 जुलै1994 मध्ये अमेझॉनची स्थापना केली. 

अमेझॉनची सुरुवात एक ऑनलाइन बुक स्टोअर म्हणून झाली आणि त्यानंतर इतर ई-कॉमर्स उत्पादने आणि इतर सेवांमध्ये कंपनीचा विस्तृत विस्तार झाला. 

Embed from Getty Images

अमेझॉन कंपनी काय करते?

जेफ बोझेस (Jeff Bezos) यांनी अमेझॉन ला ऑनलाइन (Online) विक्री (Sales), व्हिडिओ ऑडिओ स्ट्रीमिंग, क्लाऊड कम्प्युटिंग (Cloud Computing) व कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Inteligence) सारखी ई कॉमर्स (E-Commerce) उत्पादने तसेच इंटरनेट सेवा पुरविणारी जगातील सर्वाधिक यशस्वी कंपनी बनविली. 

अमेझॉन सध्या जगातील सर्वात मोठी ऑनलाईन विक्री कंपनी आहे आणि सर्वात जास्त नफा कमवणारी मोठी इंटरनेट कंपनी सुद्धा आहे.

जुलै 2018 मध्ये त्यांची संपत्ती 150 अब्ज ( billion) डॉलर्स पर्यंत वाढल्यानंतर जेफ बेझोस(Jeff Bezos)  याना “आधुनिक इतिहासातील सर्वात श्रीमंत माणूस” म्हणून गौरविण्यात आले. 

Embed from Getty Images

COVID काळात जेफ बेझोस यांची संपत्ती प्रचंड वेगाने वाढली. 

2020 पर्यंत अमेझॉनचे संस्थापक बेझोस यांची एकूण संपत्ती 200 अब्ज ( billion) डॉलरवर पोहोचली. 

त्यांची संपत्ती इतकी आहे की जगातील काही देशांच्या (झांम्बिया, एटीगुआ, सोमालिया, सेंट किट्स इ.) GDP पेक्षा अधिक आहे. 

जगाच्या इतिहासामध्ये 200 अब्ज  (billion) डॉलर्सपेक्षा अधिक निव्वळ संपत्ती (Net Worth) कमविणारे पहिले व्यक्ती होते.

जेफ बेजोस (Jeff Bezos) यांचा घटस्फोट झाला नसता तर…

बेजोस यांचा पत्नीशी घटस्फोट झाला नसता तर त्यांची संपत्ती आता ३०० अब्ज  (billion) डॉलरच्या वर गेली असती. 

बेजोस यांची माजी पत्नी मॅकेंजी बेजोस आता जगातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत दोन नंबर वर पोहोचल्या आहेत.

Embed from Getty Images

मॅकेंजी यांच्यापुढे आता फक्त Francoise Bettencourt Meyers या आहेत. भविष्यात  मॅकेंजी जगातील सर्वाधिक संपत्ती असलेल्या महिला होतील का?

अंतराळात मानवाला सहज जाता येईल त्यासाठी 2020 साली स्वत:ची ब्लू ओरिजिन (Blue Origin) नावाची एरोस्पेस कंपनीच स्थापन केली. 

141 वर्षे जुने ‘वॉशिंग्टन पोस्ट’ हे वृत्तपत्र खरेदी करून प्रिंट मीडिया मध्ये प्रवेश केला.  

आणि 

 ‘तुम्ही शोध लावत राहा. कुणी मूर्खात काढले तरी निराश होऊ नका. संधी शोधत राहा. जिज्ञासू वृत्तीला दिशा द्या’ असा सल्ला देत

2 फेब्रुवारी, 2021 रोजी जेफ बेझोस यांनी 2021 च्या तिसर्‍या तिमाहीत अमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून राजीनामा देण्याची घोषणा केली. 

 असा हा एक महानायक.  ..    सलाम जेफ बेझोस

अ‍ॅमेझॉन चे पुढील CEO कोण?

अ‍ॅमेझॉनच्या क्लाऊड कंप्यूटिंग विभागाचे प्रमुख अँडी जॅसी हे त्यांचे वारसदार असतील, Amazon चे पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अँडी जॅसी असतील.

Embed from Getty Images

आपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,

  1. कोण आहे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ज्याने मुकेश अंबानींना टाकले मागे। Zhong Shanshan
  2. सिंधुताई सपकाळ (Sindhutai sapkal) पद्मश्री पुरस्काराने सन्मानित
  3. Elon Musk नंतर, हे आहेत जगातील अव्वल श्रीमंत लोक । पहा billionaires list

आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.

आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही  नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.

आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.

वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद !

Leave a Comment