सिंधुताई सपकाळ (Sindhutai sapkal) पद्मश्री पुरस्काराने सन्मानित

Sindhutai sapkal

26 जानेवारी 2021 रोजी महाराष्ट्रातील प्रसिद्ध समाज सुधारिका सिंधुताई सपकाळ (Sindhutai sapkal) यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. 

सिंधुताई सपकाळ (Sindhutai sapkal) ज्यांना आपण “अनाथांची आई” म्हणून ओळखतो. (who is Sindhutai sapkal?) 

अनेक अनाथ मुलांचे पालन पोषण त्यांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे केले. त्यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत शेकडो अनाथ मुलांचा सांभाळ त्यांनी केला आहे.

असे एक प्रेरणादायी उदाहरण म्हणजे सिंधुताई सपकाळ (Sindhutai sapkal) या आहेत.

सिंधुताईंचा जन्म 14 नोव्हेंबर 1948 रोजी महाराष्ट्रातील वर्धा या जिल्ह्यामध्ये एका गरीब कुटुंबात झाला. 

सिंधुताईंच्या वडिलांचे नाव अभिमानजी साठे होते. सिंधुताईचे वडील त्यांना गुरे चारण्याच्या निमित्ताने शाळेत पाठवत असत पण आईने केलेल्या विरोधामुळे आणि आर्थिक परिस्थिती मुळे सिंधुताई यांच्या शिक्षणाला खीळ बसली. 

आर्थिक परिस्थिती, लहान वयात घरातल्या जबाबदाऱ्या आणि बालविवाहामुळे त्यांना चौथी पर्यंतच शिकता आले आणि नंतर त्यांनी शाळा सोडली.

सिंधुताईं सपकाळ यांचा विवाह वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी वयाने २६ वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला. 

जीवन संघर्ष

माहेरी त्यांनी महिलांच्या शोषणाविरूद्ध लढा दिला. वन विभाग आणि जमीनदारां देत असताना नवऱ्याच्या मनात सतत त्यांच्या चारित्र्या बद्दल संशय निर्माण होत असे.  शेवटी नवऱ्याने त्यांना घरा बाहेर काढले आणि त्यांना खूप कठीण जीवनाचा सामना करावा लागला. 

 नवऱ्याने हाकलल्या नंतर गावकऱ्यांनी ही त्यांना गावा बाहेर काढले.

त्याच अवस्थेत त्यांनी त्या रात्री एका गाईच्या गोठ्यामध्ये मुलीला जन्म दिला. त्यांनी आपल्या वडिलोपार्जित घरी जाण्यासाठी धडपड केली, परंतु त्यांच्या आईने त्यांना घरात घेण्यास नकार दिला.

त्यांनी अतिशय संघर्षमय जीवन जगून स्वतःचे आणि मुलीचे अस्तित्व टिकवून ठेवले. सिंधु ताईंनी आपल्या प्राथमिक गरजा भागवण्यासाठी रस्त्यावर आणि रेल्वे स्थानकांवर भीक मागितली. 

जगण्याच्या या संघर्षमय प्रवासात सिंधुताई महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यात चिखलदरा येथे आल्या. येथे वाघ संरक्षण प्रकल्पा मुळे 84 आदिवासी गावे रिकामी करण्यात आली होती, त्यामुळे सिंधु ताईंनी असहाय आदिवासी ग्रामस्थांचे योग्य पुनर्वसन करण्यासाठी संघर्ष करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या प्रयत्नांमुळे त्यांच्या संघर्षाला वनमंत्र्यांनी मान्यता दिली आणि त्यांच्या पर्यायी पुनर्वसनासाठी योग्य ती व्यवस्था केली.

आपल्या या संघर्षमय काळात त्यांना समजले की समाजात अनेक अनाथ मुले आहेत ज्यांना आईची गरज आहे.  

त्या वेळे पासून त्यांनी ठरविले की जो कोणी अनाथ त्यांच्या कडे येईल, त्यांची आई म्हणून संभाळ करेन.

स्वतःच्या मुलीला ‘श्री दगडूशेठ हलवाई, पुणे, महाराष्ट्र’ ट्रस्टला दत्तक दिली त्यामुळे त्या सर्व अनाथ मुलांच्या आई बनू शकतील.

बरीच वर्षे अथक परिश्रमा नंतर सिंधुताईंनी चिखलदरा येथे पहिले अनाथ आश्रम बांधले. त्यांनी आश्रम शाळेसाठी पैसे गोळा करण्यासाठी त्यांनी बरीच शहरे आणि गावांना भेटी दिल्या. 

आता पर्यंत, त्यांनी 1200 मुलांना दत्तक घेतले आहे, जे प्रेमाने त्यांना ‘माई’ म्हणून संबोधतात. त्यापैकी बरीच मुले आता प्रतिष्ठित डॉक्टर आणि वकील म्हणून काम करत आहेत.

सिंधुताई सपकाळ (Sindhutai sapkal) यांची प्रेरक जीवन कथा नशिब आणि दृढनिश्चय यांचा संगम आहे. 

स्वतंत्र भारतात जन्मल्या नंतरही भारतीय समाजात उपस्थित सामाजिक अत्याचारांना त्या बळी पडल्या. 

आपल्या जीवनाचे धडे स्वतः घेत त्यांनी महाराष्ट्रात अनाथांसाठी सहा अनाथाश्रम बनवले, त्यांना अन्न, शिक्षण आणि निवारा उपलब्ध करुन दिला. त्यांच्यामार्फत चालविल्या जाणार्‍या संस्थांनी असहाय आणि बेघर अशा महिलांना सुद्धा मदत केली.

आपले अनाथाश्रम चालविण्यसाठी सिंधुताईंनी पैशा साठी कुणापुढे हात कधीच पसरवले नाहीत, त्याऐवजी त्यांनी सार्वजनिक व्यासपीठांतून प्रेरणादायी भाषणे केली आणि समाजातील वंचितांना व उपेक्षित वर्गांना मदत करण्यासाठी जनतेचा पाठिंबा मागितला.

सिंधुताई संचलित संस्था 

 • बाल निकेतन हडपसर ,पुणे. 
 • सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह , चिखलदरा. 
 • अभिमान बाल भवन , वर्धा. 
 • गोपिका गाईरक्षण केंद्र , वर्धा ( गोपालन). 
 • ममता बाल सदन, सासवड. 
 • सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व शिक्षणसंस्था, पुणे. 

सिंधुताईंच्या जीवना वरील चित्रपट

अनंत महादेवन यांनी 2010 मध्ये मराठी चित्रपट “मी सिंधुताई सपकाळ” हा सिंधुताई सपकाळ (Sindhutai sapkal) यांच्या जीवनावर बायोपिक बनविला. 54 व्या लंडन मधील भव्य चित्रपट महोत्सवात या चित्रपटाची वर्ल्ड प्रीमियर साठी निवड करण्यात आली होती.

पुरस्कार व गौरव 

 • आयटी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दत्तक माता पुरस्कार (1996)
 • सोलापूरचा डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार
 • राजाई पुरस्कार
 • शिवलीला महिला गौरव पुरस्कार.
 • 2008 – दैनिक लोकसत्ताचा ‘सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार’
 • महाराष्ट्र शासनाचा ‘अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ (2010)
 • महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार (2012)
 • सीएनएन-आयबीएन आणि रिलायन्स फाउंडेशनने दिलेला ‘रिअल हीरो पुरस्कार’ (2012).
 • पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजचा ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुरस्कार’ (2012)
 • मूर्तिमंत आईसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार (2013)
 • प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (2015)
 • डॉ. राम मनोहर त्रिपाठी पुरस्कार (2017)
 • पुणे विद्यापीठाचा ‘जीवन गौरव पुरस्कार
 • पद्मश्री पुरस्कर 

आपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,

 1. 20 Memorable Things of 2020
 2. Sheetal amte suside | डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या ।

आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.

आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही  नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.

आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.

वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद !

Leave a Comment