आपल्यासाठी ऑक्सिजन इतके महत्वाचे का आहे?(Importance of Oxygen)

oxygen information marathi

ऑक्सिजन (Oxygen) हा एक महत्वाचा वायू आहे जो औषध म्हणून लोकांचे प्राण वाचविण्यास मदत करतो म्हणून याला प्राणवायू असे ही म्हणतात.

ऑक्सिजन वापर 1800 च्या दशकापासून औषध (Drug) म्हणून वापरले जात आहे आणि सध्या आपण त्याचा उपयोग आणि वितरण प्रणाली (Distribution) या दोन्ही बाबतीत खूप पुढे आलो आहे.

अनुक्रमणिका

01. कोविड-19 (Covid-19) आणि ऑक्‍सिजन काय संबंध आहे?

कोविड-19 (Covid-19) हा आजार SARS-CoV-2 नावाच्या नवीन कोरोना व्हायरसमुळे होतो. WHO ला प्रथम 31 डिसेंबर 2019 रोजी या नवीन विषाणूची माहिती मिळाली त्यामुळे या व्हायरसला COVID-19 असे म्हणतात. 

बहुतेक सुमारे 80% रुग्ण रुग्णालयात उपचार न घेता या आजारापासून बरे होतात. सुमारे 15% गंभीर आजारी पडतात आणि त्यांना ऑक्सिजनची आवश्यकता असते आणि 5% गंभीर (Critical) आजारी पडतात आणि त्यांना ICU मध्ये उपचार करण्याची आवश्यकता भासते. श्वसन प्रक्रियेमध्ये गुंतागुंत होऊन पेशंट दगावू शकतो.(Source)

सध्या चालू असलेल्या नॉवेल कोरोना व्हायरस कोविड-19 (Covid-19) हा साथीचा रोग मर्यादित आरोग्य सुविधा असलेल्या देशांत गंभीर धोका निर्माण करत आहे. 

भारतात याची खूपच गंभीर परिस्थिती आहे. कोविड-19 (Covid-19) चे सर्वात गंभीर परिणाम म्हणजे रुग्ण निमोनिया(Pneumonia) या आजाराने critical होतो आणि यासाठी रुग्णांच्या अस्तित्वासाठी पुरेसा ऑक्सिजन सपोर्ट महत्त्वपूर्ण आहे. 

हायपोक्सिमिया (Hypoxemia) असलेल्या गंभीर कोविड-19 (Covid-19) रूग्णांच्या उपचारासाठी पूरक ऑक्सिजन (Supplementary/External) ही पहिली आवश्यक पायरी आहे आणि यासाठी आपण मेडिकल ऑक्सिजन (Medical Oxygen) चा वापर करतो. 

आता मेडिकल ऑक्सिजन म्हणजे काय? त्यासाठी पुढील माहिती पहा.

02. मेडिकल ऑक्सिजन म्हणजे काय (What is Medical Oxygen)?

what is oxygenm and why it is important in marathi

वैद्यकीय उपचार करण्यासाठी जो ऑक्सिजन वापरतात त्याला मेडिकल ऑक्सिजन असे म्हणतात. वेगवेगळ्या वैद्यकीय उपचारसाठी हा ऑक्सिजन वापरतात म्हणून याला ऑक्सिजन थेरपी असे हि म्हणतात. रक्तातील ऑक्सिजन पातळी कमी असेल तर ऑक्सिजन थेरपीचा उपचार करतात.

मेडिकल ऑक्सिजन (Medical Oxygen) चा उपयोग श्वसनक्रिया, ह्रदयाचा झटका, शॉक, कार्बन मोनोऑक्साइडची विषबाधा आणि गंभीर रक्तस्त्राव यासारख्या स्थितीत पेशींमधील ऑक्सिजन पातळी पुरेशी ठेवण्यासाठी केला जातो. 

मेडिकल ऑक्सिजन हा द्रव (Liquid) स्थितीमध्ये असतो. मेडिकल ऑक्सिजन हा −182.96 °C  अश्या अति शीत तापमानात साठविला जातो. वाहतूक करताना सुद्धा −182.96 °C हे तापमान स्थिर ठेवावे लागते.

03. मेडिकल ऑक्सिजन चे उत्पादन कसे करतात (How Medical Oxygen is made)?

where oxygen is made

उच्च शुद्धतेचा (High Purity) मेडिकल ऑक्सिजन तयार करताना क्रायोजेनिक एअर विभाजक (Cryogenic Air Seperator) या पद्धतीचा वापर केला जातो. या प्लांट मधील विज्ञान सोपे आहे.  

एक ASU (Air Separator Unit ) हे वातावरणातील मुबलक हवा (Ambient Air) घेते आणि विभक्त (Separation) आणि ऊर्धपातन (Distillation) च्या अनेक प्रक्रिया करून त्यांच्या Boiling Point च्या आधारे ऑक्सिजन (Oxygen), नायट्रोजन (Nitrogen), आर्गॉन (Argon) वेगळे केले जातात. 

क्रायोजेनिक (Cryogenic) प्रक्रियेद्वारे उत्पादित ऑक्सिजन सामान्यत: 99.5% पेक्षा जास्त शुद्ध (Pure) असावे लागते जेणेकरुन वैद्यकीय उपचारासाठी मूलत: वापरले जाऊ शकते. 

वैद्यकीय ऑक्सिजन (Medical Oxygen) हे आरोग्यसेवा क्षेत्रात औषध किंवा फार्मास्युटिकल (Pharmaceutical) उत्पादन म्हणून मानले जाते. 

कोविड-19 (Covid-19) या साथीच्या रोगात, आपल्याला समजले आहे की ऑक्सिजन हे वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात क्रिटिकल (Critical) औषध बनले आहे.  

पेशींमधील ऑक्सिजन पातळी पुरेशी ठेवण्यासाठी ऑक्सिजन हे रुग्णांना अतिशय उपयुक्त आहे. कोविड-19 (Covid-19) च्या साथीत वैद्यकीय ऑक्सिजन (Medical Oxygen) चे महत्व सर्वाना पटले आहे.

04. ऑक्सिजन उत्पादन करताना कोणते मटेरियल वापरली जाते(Which type of Material is used while making oxygen? What type of material is oxygen)?

fresh air is the raw material of oxygen

ऑक्सिजन उत्पादन करताना वातावरणातील हवा (Ambient Air) वापरतात. त्यानंतर उच्च शुद्धतेचा (High Purity) मेडिकल ऑक्सिजन तयार करताना क्रायोजेनिक एअर विभाजक (Cryogenic Air Seperator) या पद्धतीचा वापर केला जातो. 

विभक्त (Seperation) आणि ऊर्धपातन (Distillation) च्या अनेक प्रक्रिया करून त्यांच्या Boiling Point च्या आधारे ऑक्सिजन (Oxygen), नायट्रोजन (Nitrogen), आर्गॉन (Argon) वेगळे केले जातात. 

05. Ambient Air म्हणजे काय (What is Ambient Air)?

Ambient Air म्हणजे आपल्या आजूबाजूला असलेली वातावरणातील हवा.

06. वातावरणातील हवेत ऑक्सिजन चे प्रमाण काय असते (What is the percentage of oxygen in the air)?

आपल्या सभोवतालच्या नैसर्गिक हवेमध्ये अंदाजे 21% ऑक्सिजन (Oxygen), 78% नायट्रोजन (Nitrogen) , 1% अर्गोन (Argon)सह, कार्बन डाय ऑक्साइड (Co2), निऑन आणि झेनॉन (Neon and Xenon) सारखे इतर वायू असतात.

07. मेडिकल ऑक्सिजन आणि इंडस्ट्रिअल ऑक्सिजनमध्ये काय फरक आहे (What is the Difference between Medical Oxygen & Industrial Oxygen)? 

medical vs industry oxygen in marathi

वैद्यकीय ऑक्सिजन (Medical Oxygen) हा आपल्या रक्तातील ऑक्सिजन पातळी पुरेशी ठेवण्यासाठी वापरतात. 

 • हा ऑक्सिजन आपण रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरतो.
 • वैद्यकीय ऑक्सिजन (Medical Oxygen) चा उपयोग श्वसनक्रिया, ह्रदयाचा झटका, शॉक, कार्बन मोनोऑक्साइडची विषबाधा आणि गंभीर रक्तस्त्राव यासारख्या स्थितीत पेशींमधील ऑक्सिजन पातळी पुरेशी ठेवण्यासाठी केला जातो.
 • हे वैद्यकीय ऑक्सिजन औषध म्हणून नियंत्रित केले जाते. 

औद्योगिक ऑक्सिजन (Industrial Oxygen) हा ऑक्सिजनचा एक प्रकार आहे जो आपण औद्योगिक कामासाठी  वापरतो. 

औद्योगिक ऑक्सिजन चा वापर खालील प्रकारच्या उद्योगामध्ये केला जातो. 

 • उद्योगा मध्ये मुख्यतः गॅस वेल्डिंग, गॅस कटिंग, ऑक्सिजन स्कार्फिंग, Flame cleaning, flame straightening यासाठी ऑक्सिजन वापरला जातो.
 • धातू उत्पादन, स्टील उत्पादन या उद्योगामध्ये ऑक्सिजनचा वापर होतो.
 • पेट्रोलियम उद्योगामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनचा वापर केला जातो. 
 • ग्लास, सिरॅमिक, पेपर उत्पादन करताना औद्योगिक ऑक्सिजन वापरला जातो.

08. वैद्यकीय ऑक्सिजन स्टोअर कसा करतात (How Medical Oxygen is stored)?

how medical oxygen is stored in marathi

वैद्यकीय ऑक्सिजन (Medical Oxygen) एक तर सिलेंडर्समध्ये , व्हॅक्यूम इन्सुलेटेड इव्हॅपोरेटर (Vacuum Insulated Evaporator) किंवा मॅनिफोल्ड सिलिंडर बँक (Manifold Cylinder Bank) मध्ये साठविता येतो. 

बहुतेक ऑक्सिजन स्टोरेज सिलिंडर (Cylinder) स्टीलचे बनलेले असतात. अ‍ॅल्युमिनियम एमआरआय (MRI) सूट सिलिंडरसाठी वापरला जातो. सिलिंडर (Cylinder) च्या बॉडीचा कलर काळा असतो आणि Shoulders पांढऱ्या कलरचे असतात.

VIE (Vacuum-insulated evaporator) हा एक प्रचंड थर्मॉस फ्लास्क असतो ज्या मध्ये Liquid oxygen स्टोअर करतात मुख्यतः मोठ्या हॉस्पिटल्समध्ये याचा वापर केला जातो.(How Medical Oxygen is stored in Hospital?)

मॅनिफोल्ड सिलिंडर गॅस सिस्टम (Manifold Cylinder Bank) मध्ये दोन मॅनीफोल्डला बॅंक्स साईड असतात आणि प्रत्येक साईडला पाच सिलिंडर (Cylinder) पाईप लाईनने जोडता येतात.

हे मुख्यतः छोटया हॉस्पिटल्स मध्ये वापरतात आणि पाइपलाइनद्वारे ऑक्सिजन पूर्ण हॉस्पिटल मध्ये पुरविला जातो. 

09. वैद्यकीय ऑक्सिजन स्टोअर करताना काय काळजी घ्यावी लागते (how to safely store medical oxygen)?

 • ऑक्सिजन हा इतर ज्वलनशील वायू किंवा पदार्थाप्रमाणे साठवणूक करून ठेवू नये. 
 • ऑक्सिजन सिलेंडर ज्वलनशील पदार्थापासून कमीत कमी 20 फूट अंतरावर ठेवणे गरजेचे आहे. 
 • सिलेंडर्स रॅकमध्ये किंवा साखळ्यांद्वारे सुरक्षित करणे आवश्यक आहे. 
 • सिलेंडर्सचे टेस्टिंग, गॅस रुलच्या नियमाप्रमाणे वेळच्यावेळी होणे गरजेचे आहे.
 • वैद्यकीय ऑक्सिजन (Medical Oxygen) स्टोअर (Store) करताना आणि पायपिंग द्वारे हॉस्पिटलला पुरविताना खूप साऱ्या पाईप्स, व्हॉल्व्ह (Valves) आणि अनेक प्रकारच्या जोडण्या केलेल्या असतात. 

अश्या परिस्थितीत या सर्व सिस्टिमचे वेळच्यावेळी प्रतिबंधात्मक देखभाल (Preventive Maintenance) झालीच पाहिजे. यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ कंपन्यांना AMC (Annual Maintenance Contract) देणे गरजेचे आहे. 

 • वेळच्यावेळी पाईप मधील, व्हॉल्व्ह मधील गळती (Leakage) तपासणे गरजेचे आहे.
 • हॉस्पिटल्सनी वेळच्यावेळी फायर ऑडिटही (Fire Audit) करणे आवश्यक आहे. 

10. ऑक्सिजन हा इतका महत्वाचा का आहे? (Why Oxygen is so Important?)

why oxygen is important for covid patient

मानव प्राणी तसेच पृथ्वीवरील सर्व सजीव प्राणीमात्रांसाठी ऑक्सिजन खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो, आपण मानव आणि इतर प्राण्यांसह सर्वाना जिवंत राहण्यासाठी श्वास घेत असलेल्या हवेमध्ये ऑक्सिजनची आवश्यकता असते. 

ऑक्सिजन महत्त्वपूर्ण आहे, कारण यामुळे आपल्या पेशींना आणि पेशी समूहामध्ये कार्य करण्याची शक्ती मिळते. 

वनस्पती आणि अनेक प्रकारच्या सूक्ष्मजंतूंच्या प्रकाशसंश्लेषणा (Photosynthesis) च्या वेळी ऑक्सिजन तयार होतो. 

11. निरोगी मनुष्यामध्ये रक्तामधील मधील ऑक्सिजनचे प्रमाण किती असते (What is normal blood oxygen level)? 

normal blood oxyi level in marathi

रक्तातील ऑक्सिजन पातळी म्हणजे आपल्या लाल रक्तपेशी किती ऑक्सिजन बाळगतात याचे एक माप आहे. आपले शरीर आपल्या रक्ताच्या ऑक्सिजन पातळीवर बारकाईने नियंत्रण ठेवते. 

रक्तातील ऑक्सिजनची पातळी अचूक आणि संतुलीत राखणे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. साधारणपणे मुले आणि सुदृढ/निरोगी प्रौढांच्या रक्तातील ऑक्सिजन पातळीचे निरीक्षण करण्याची आवश्यकता नसते. 

खरं तर, श्वास लागणे किंवा छातीत दुखणे यासारख्या समस्येची चिन्हे दर्शविल्याशिवाय बरेच डॉक्टर याची तपासणी करणार नाहीत. (Source)

जर मुले आणि सुदृढ/निरोगी प्रौढांच्या रक्तातील ऑक्सिजन पातळीचे निरीक्षण Pulse Oximeter ने मोजली आणि आपल्या रक्तातील ऑक्सिजन पातळी (SpO2) सामान्यत: 95 ते 100 टक्के असणे गरजेचे असते. ऑक्सिजन ची लेवल 95 टक्क्यांपेक्षा कमी असेल तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधने आवश्यक आहे. 

12. हायपोक्सिमिया म्हणजे काय (What is Hypoxemia)?

रक्तामध्ये ऑक्सिजन सामान्य पातळी पेक्षा कमी होणे याला हायपोक्सिमिया (Hypoxemia).असे म्हणतात. ऑक्सिजनची पातळी जितकी कमी असेल तितका तीव्र हायपोक्सिमिया (Hypoxemia) असतो. यामुळे शरीराच्या ऊती (Tissues) आणि अवयवां (Body Organ) मध्ये गुंतागुंत होऊ शकते.

जर आपल्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी असेल तर आपल्याला ऑक्सिजन संपृक्तता(Saturation) वाढविण्याची आवश्यकता असते. 

त्यासाठी सहसा पूरक (supplemental/external) ऑक्सिजन द्वारे ऑक्सिजन saturation वाढवू शकतो. 

(Source)

13. ऑक्‍सिजन पातळी योग्य आहे का हे तुम्ही कसे तपासाल (how to check right oxygen level at home)?

तुमच्या रक्तात ऑक्सिजनची पातळी योग्य आहे की नाही हे तपासण्यासाठी पल्स ऑक्सिमीटर (Pulse Oximeter) महत्त्वाचं आहे. यामुळे अनेक रुग्णांना घरच्या घरी आपल्या ऑक्सिजनची पातळी नियमितपणे तपासता येते. ज्यांची ऑक्सिजन पातळी चांगली होती ते घरची थांबून बरे झाले आणि ज्यांच्या ऑक्सिजन पातळीत घट झाली त्यांना रुग्णालयात दाखल करुन उपचार करण्यात आले.

कोरोनाच्या महामारीत प्रत्येक घरात ऑक्सिजन पातळी सातत्याने तपासत राहणं महत्त्वाचं ठरत आहे. ते कसे तपासावे हे खाली दिले आहे?

14. ऑक्सीमीटर म्हणजे काय (What is Pulse Oximeter? How it is used)?

 Pulse Oximeter
Photo by Stanley Ng from Pexels

पल्स ऑक्सीमीटर डिजीटल यंत्र असून ते आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी तपासण्यासाठी वापरतात. त्याला पीपीओ (PPO) म्हणजेच पोर्टेबल पल्स ऑक्सिमीटर देखील म्हणतात. 

क्लिपसारखं काम करणारं हे यंत्र मागच्या बाजूने दाबलं की त्यात आपल्या हाताचं बोट (तर्जनी) ठेऊन ऑक्सिजन पातळी तपासता येते, खालील स्टेप्स पाहून घ्या-

 1. आपलं बोट ऑक्सिमीटर मध्ये ठेवण्याआधी मशीन सुरु करावं. 
 2. मशीन सुरु केल्यानंतर त्यात लाईट लागेल. 
 3. मशीन रक्तातील ऑक्सिजन मधील पातळी (Level) तपासून त्याचं प्रमाण स्क्रीनवर दाखवतं. यामुळे नियमितपणे काही तासांनी ऑक्सिजनची पातळी तपासता येते.

प्राणवायूसाठी कधी प्राण पणाला लागतील असे कोणी स्वप्नातही विचार केला नसेल आणि कोरोना काळात संपूर्ण जगभरातील जनतेला ऑक्सिजनचे महत्व कळले आहे.

आपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,

हे हि वाचा –

 1. मागील वर्षी Apple, Samsung पेक्षा जगात सर्वात जास्त फोन चायनीज का विकले गेले 
 2. Ford-GT फोर्डची अशी कार जी आपण सहजरित्या खरेदी करू शकतच नाही… का ते जाणून घ्या
 3. जाणून घ्या भारताबद्दल अशा काही गोष्टी ज्या कोणाला माहित नाहीत…

आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.

आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही  नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.

आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.

वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद !

Leave a Comment