Xiaomi चा नवीन फ्रेमलेस Concept Phone: No Buttons, No Ports

Xiaomi new concept phone
source-xiaomi

चायनीज स्मार्टफोन तयार करणारी कंपनी Xiaomi ने आज आपला पहिला quad-curved waterfall screen असलेला Concept phone अधिकृतपणे सादर केला.

ह्या स्मार्टफोनची खासियत म्हणजे, या फोनमध्ये कोणतेही बटन नाही, हेडफोन पोर्ट नाही आणि जवळपास फ्रेम नसलेला हा एक फ्रेमलेस फोन आहे.

तुम्हाला अधिक माहितीसाठी खाली विडिओ दिला आहे, तो नक्की पहा. 

88° हायपर quad-curved waterfall screen डिझाइन व्हिज्युअल इंटरफेसमुळे जेव्हा तुम्ही स्क्रीनवर काही पाहत असाल तर तुमचा प्रत्येक स्क्रोल हा तुम्हाला पाण्याच्या लाटे प्रमाणे experiance देईल. 

स्मार्टफोनची जवळजवळ संपूर्ण फ्रेम स्क्रीनद्वारे कव्हर केली गेली आहे, तर त्याच्या फ्रेमवर कोणतेही पोर्ट किंवा बटणे नसतात, ज्यामुळे भविष्या युनिबॉडी नो-पोर्ट डिझाइन असलेले फोन बाजारात आणले जातील यात शंका नाही. 

Xiaomi ने कल्पनाशक्ती आणि वास्तविकता यांच्यातील उत्कृष्ट समतोल शोधण्याचा प्रयत्न करीत नवीन शोध कधीच थांबवत नाही. 

क्लासिक स्मार्टफोन फॉर्म फॅक्टरची मर्यादा ओलांडून, शाओमीने स्मार्टफोनला शक्य तितके सोपे बनवण्याचा प्रयत्न केला आणि फॉर्म ला प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला.

Xiaomi च्या नवीन concept Phone बाबत आणखी थोडंसं 

जसे samsung ने आपला Foldable Phone बाजारात आणून स्मार्टफोन इंडस्ट्रीमध्ये जणू क्रांतीच घडवून आणली आहे. 

तोच आदर्श घेऊन लवचिक डिस्प्ले किंवा फोल्डिंग डिस्प्ले फोन उद्योगातील प्रथम चतुर्भुज-वक्र म्हणजेच सर्व बाजूस स्क्रीन असलेला एक फ्रेमलेसConcept phone तयार करण्याचे Xiaomi ने ठरवले. 

यामध्ये सर्वात मोठे आव्हान डिस्पले वाकवणे होते, तर त्याऐवजी त्यांनी 88° चतुर्भुज-वक्र काचेचे पॅनेल आणि 3D बॉडी डिझाईन तयार करणे पसंद केले.

महत्त्वाचे म्हणजे काचेच्या अशा तुकड्याच्या करण्याच्या मागे हजारो प्रयत्न असतील त्यात काही शंका नाही.

स्मार्टफोन भविष्यासाठी एक नवीन दिशा 

भविष्यातील येणाऱ्या स्मार्टफोनमध्ये डिस्प्ले हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. 

Quad-curve डिस्प्लेमध्ये Xiaomi च्या नवीन प्रगतीसह, भविष्यात अजून कोणकोणत्या प्रकारचे

फोन आपल्या हातात असतील हे काही सांगता येत नाही. 

ह्या अप्रतिम डिझाइन वरून असे दिसून येते कि फोनच्या जवळजवळ सर्व बाजूंनी डिस्पले आहे. Xiaomi ने ह्या Phone साठी 46 पेटंट ची नोंदणी केली आहे, हे खरंच कौतकास्पद आहे. 

एकंदरीत जर हा फोन प्रत्यक्षात आला तर खूपच चांगली गोष्ट आहे, कारण Xiaomi ने काही वर्षांपूर्ण अश्याच प्रकारच्या एका काल्पनिक फोन Mi Max ची घोषणा केली होती, पण अजून तरी तो फोन आपल्याला प्रत्यक्षात दिसला नाही.

आपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,

  1. Should I Buy A 5G Phone Now?: 5G फोन खरेदी करण्याची हि योग्य वेळ आहे का ?
  2. Xiaomi Mi Air Charge: चालता फिरता सहजपणे आपला स्मार्टफोन चार्ज करा
  3. Poco सर्वांसाठी घेऊन येत आहे आपला नवीन वर्षातील नवीन फोन Poco M3: किंमत फक्त..

आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.

आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही  नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.

आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.

वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद !

Leave a Comment