कोण आहे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ज्याने मुकेश अंबानींना टाकले मागे। Zhong Shanshan

Zhong Shanshan
image source – Forbes

झोन्ग शानशान (Zhong Shanshan) आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, एका  दिवसामध्ये 5.4 बिलियन डॉलर कमविणारे झोन्ग शानशान (Zhong Shanshan) कोण आहेत?

चीनच्या नवीन श्रीमंत झालेल्या व्यक्तीने आपल्या कमाईमध्ये आणखी 5.4 अब्ज डॉलर्सची भर घातली आहे.

Nongfu Spring या बॉटल्ड वॉटर कंपनीचे अध्यक्ष झोंग शानशान (Zhong Shanshan) जगातील सहावे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. यांची कमाई $ 92.1 बिलियन झाली आहे.  

गेल्या वर्षभरात त्याच्या कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. हाँगकाँग (Honkong) स्टॉक मार्केट मध्ये सूचीबद्ध असलेली कंपनी, गेल्या सप्टेंबरमध्ये पब्लिक लिस्टेड झाली.

गेल्या 4 महिन्यांत त्याच्या शेअर्सची किंमत तीनपटने वाढली आहे, आणि मंगळवारी तर त्याच्या शेअर्समध्ये एकदम 6.5% वाढ झाली. 

झोंग यांनी आपल्या कमाईमध्ये आणखी 5.4 अब्ज डॉलर्सची भर एका दिवसात घातली गेली आणि एकूण कमाई $ 92.1 बिलियन झाली आहे.

झोंग (Zhong Shanshan) यांच्या कडे कंपनीचे 84.4% शेअर्स आहेत तसेच पत्नीच्या आणि त्याच्या नातेवाईकांकडे अतिरिक्त 6.2% चे शेअर्स आहेत. 

गेल्या महिन्यात आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून झोंगनी (Zhong Shanshan) भारताच्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना ही मागे टाकले.

झोंगने चीनच्या सांस्कृतिक क्रांतीच्या (Cultural Revolution) काळात प्राथमिक शाळा सोडली आणि त्यानंतर बांधकाम कामगार व वृत्तपत्रातील वार्ताहर तसेच पेय विक्री एजंट म्हणून काम केले. 

त्यांनी 1996  मध्ये हँग्जो प्रांतामध्ये नोंगफू (Nongfu ) कंपनी स्थापन केली. बाटलीबंद पाण्यासाठी प्रसिद्धी असणारी कंपनी चहा आणि रस सारख्या इतर पॅकेज्ड पेयांचीही विक्री करते.

झोंग यांच्याकडे बीजिंग वांताई बायोलॉजिकल फार्मसी एंटरप्राइझमधील नियंत्रक भागभांडवल देखील आहे, जे COVID-19 यासह संसर्गजन्य रोगांच्या चाचणी करणारी किट तयार करते. 

एप्रिल 2020 मध्ये कंपनी शांघाय स्टॉक एक्सचेंजवर (Shanghai Stock Exchange) मध्ये नोंद झाली. आयपीओ (IPO) पासून त्यांच्या शेअर्समध्ये जवळपास 2500% इतकी प्रचंड वाढ झाली आहे.

66 वर्षीय असलेले आणि सामाजिक सर्कल पासून दूर राहणारे  ‘लोन वुल्फ’ (Lone Wolf) म्हणून ओळखले जाणारे बघुयात जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कधी होतात ते?

आपण या लेखा सारखेच आणखी काही लेख बघु शकता, त्यासाठी खाली दिलेल्या लेखावर क्लिक करा,

  1. Forbes च्या म्हणण्यानुसार, Elon Musk आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिली नाही
  2. Elon Musk नंतर, हे आहेत जगातील अव्वल श्रीमंत लोक । पहा billionaires list ।

आपल्याला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यामध्ये थोडी सुधारणा झाली पाहिजे असे आपल्याला वाटत असल्यास, यासाठी आपण खाली कंमेंट लिहू शकता.

आपल्याला ह्या पोस्ट मधून किंवा इतर काहीही  नवीन शिकायला मिळाले असेल आणि हे आपणास आवडत असल्यास कृपया फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअप्प सारख्या इतर सोशल मीडिया साइट्ससारख्या सोशल नेटवर्क्सवर हे पोस्ट share करा.

आणि अश्या पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी उजव्या बाजूस दिलेल्या घंटे (Bell) वर क्लिक करा म्हणजे आमचा प्रत्येक नवीन लेख सगळ्यात पहिला तुम्हाला वाचता येईल आणि तोहि पूर्णपणे मोफत.

वाचा आणि आनंदी रहा ! धन्यवाद ! 

Leave a Comment